शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वलांसह ६६६ वन्यजीवांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली प्रगणना दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वल, ५१ गवे, ३२४ रानडुकर, ११४ चितळ, १३ नीलगाय, १३ रानकुत्रे, २२ सांबर, १८ मोर, २ सायळ, ४९ वानर आढळून आले.

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोका वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांच्या पसंतीचे आश्रयस्थान ठरल्याचे निसर्गानुभव प्रगणनेत दिसून आले आहे. या समृद्ध जंगलात चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वलांसह ६६६ वन्यजीवांचे दर्शन झाले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव श्रेत्राअंतर्गत बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत वन्यप्राण्यांची मचानावरून प्रगणना करण्यात आली.कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेली प्रगणना दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी चार वाघ, पाच बिबट, १७ अस्वल, ५१ गवे, ३२४ रानडुकर, ११४ चितळ, १३ नीलगाय, १३ रानकुत्रे, २२ सांबर, १८ मोर, २ सायळ, ४९ वानर आढळून आले. वन्यजीव विभागाच्यावतीने ही प्रगणना घेण्यात आली. यात वन्यजीव प्रेमींसह वनाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. वन्य प्राण्यांचे  दर्शन झाल्याने सर्वांमध्ये पौर्णिमेच्या रात्री उत्साह संचारला होता.

वाघिणीसह बछड्यांचे झाले दर्शन

- अभयारण्यातील एका तलावावर २९ एप्रिल रोजी वाघिणीसह तीन बछड्यांचे दर्शन जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना झाले होते. त्यानंतर तीन आठवडे पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. प्रगणना दरम्यान त्या वाघिणीसह बछड्यांच्या दर्शनाची उस्त्सुकता होती. अखेर सायंकाळी व सकाळच्या सुमारास त्याच तलावावर वाघीण आणि तिच्या तीन बछड्यांचे दर्शन प्रगणकांना झाल्याने त्यांचा आनंद अवर्णनीय होता.निसर्गानुभवाने प्रगणक आनंदले- निसर्गाच्या सानिध्यात व वन्यजीवांच्या सहवासात झालेला निसर्गानुभव कार्यक्रम प्रगणकांसाठी पर्वणी ठरली. रात्रीच्या सुमारास स्मशान शांतता, वन्यजीवांचा आवाज, थंड हवेची झुळूक, अचानक पालापाचोळ्यांचा आवाज, रमणीय पहाट, उंच डोंगर व दऱ्या, पाणवठ्यांवर प्राण्यांची सावध उपस्थिती आदी अनुभव नावीन्यपूर्ण तसेच भावविभोर करणाऱ्या ठरल्याची प्रतिक्रिया कार्यक्रम संपल्यानंतर अनेक प्रगणकांनी दिली.

 

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग