शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

भोजन कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना डांबले

By admin | Updated: February 24, 2016 00:32 IST

आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आले.

निकृष्ट भोजनाला विद्यार्थ्यांचा विरोध पोलिसांच्या मदतीने सुटका, आदिवासी वसतिगृहातील प्रकारपवनी : आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी याला विरोध केल्याने संतप्त भोजन पुरवठा ठेकेदाराने त्यांना स्वयंपाक खोलीत डांबले. हा प्रकार रविवारी रात्री घडला. सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांच्या मदतीने त्यांची १२ वाजता सुटका करण्यात आली.आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शासनाने त्यांना शिक्षणाचे दालन उघडले आहे. निवासाकरीता वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्याचे कंत्राट मोहन डोंगरे यांना देण्यात आले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तो निकृष्ट दर्जाचे भोजन विद्यार्थ्यांना देत आहे. याबाबत रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी गृहपालाला तक्रार दिली. व ठेकेदाराला विचारणा केली असता त्याने दमदाटी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान रात्री सदर कंत्राटदाराने सकाळी उरलेला निकृष्ठ भात व भाजीपोळ्या विद्यार्थ्यांना खायला दिल्या. त्यामुळे कंत्राटदार व विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यावेळी भोजन कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना स्वयंपाक खोलीत डांबून बाहेर कुलूप लावले व त्यातून पळ काढला. याची माहिती विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीवरून गृहपाल मेश्राम यांना दिली. मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करून वसतिगृहात आले नाही. दरम्यान प्रकरणाची माहिती गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलिसांसह वसतिगृह गाठले. यावेळी पोलिसांनी डांबलेल्या विद्यार्थ्यांना रात्री १२ वाजताचा सुमारास कुलूप तोडून बाहेर काढले. यानंतर उपाशीपोटी असलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंपाक बनवून जेवण देण्यात आले. दरम्यान, प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी यांनी सोमवारला वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी कंत्राटदार डोंगरे व गृहपाल मेश्राम यांना नोटीस बजावून कारवाई करण्याचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)भोजन पुरवठा ठेकेदार डोंगरे यांनी जाळ तांदळाचा भात बनवून विद्यार्थ्यांना दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे वाद होवून विद्यार्थ्यांनी भोजनास नकार दिल्याचा प्रकार घडला.-नितीन मेश्राम, गृहपाल