पूरग्रस्तांना मिळणार पाच लिटर रॉकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:10+5:30

पूरग्रस्तांना शासनाकडून प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल वितरित करण्यात येणार असून तसे आदेश रॉकेल डिलरधारकांना देण्यात आल्याची माहिती तुमसर तालुका प्रशासनाने दिली. पूरग्रस्तांकरिता शासनाने अन्नधान्याचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला आहे. पूरग्रस्तांचे पंचनामे होऊन यादीत नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात पूराने थैमान घातले होते.

Flood victims will get five liters of kerosene | पूरग्रस्तांना मिळणार पाच लिटर रॉकेल

पूरग्रस्तांना मिळणार पाच लिटर रॉकेल

Next
ठळक मुद्देडिलरला दिले आदेश : यादीत नाव असलेल्यांनाच मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील पूरग्रस्तांना शासनाकडून पाच लिटर रॉकेल वितरीत करण्यात येणार आहे. सदर रॉकेल स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून मिळणार असून पूरग्रस्तांच्या यादीत समावेश असलेल्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
पूरग्रस्तांना शासनाकडून प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल वितरित करण्यात येणार असून तसे आदेश रॉकेल डिलरधारकांना देण्यात आल्याची माहिती तुमसर तालुका प्रशासनाने दिली. पूरग्रस्तांकरिता शासनाने अन्नधान्याचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला आहे. पूरग्रस्तांचे पंचनामे होऊन यादीत नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तुमसर तालुक्यातील नदी काठावरील गावात पूराने थैमान घातले होते. पूराने मोठ्या प्रमाणत शेती व घरांचे नुकसान झाले होते. अशा पूरग्रस्तांना दिलासा देण्याकरिता शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. तालुक्यातील पूरग्रस्तांना लवकरच रॉकेल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तालुका प्रशासनाने याची तयारी सुरु केली आहे.

जिल्ह्यात केवळ दोन डिलर
बाजारात राूकेल प्रती लीटर २६ रुपयांचा भाव आहे. रॉकेल सध्या मिळत नाही. त्यामुळे मागणी असूनही रॉकेलपासून सामान्य नागरिक वंचित राहत आहेत. भंडारा जिलह्यात यापूर्वी सात केरोसिनचे डिलर होते. सध्या केवळ दोन डिलर आहेत. ज्या नागरिकांकडे गॅस कनेक्शन आहे. त्यांना केरोसीन मिळणे बंद असल्याने रॉकेल सर्वसामान्यांना मिळेनासे झाले आहे.
रॉकेल पुरवठ्यामुळे नागरिकांना दिलासा
ग्रामीण परिसरात शासनाने पूरग्रस्तांना रॉकेल पुरवठ्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज गेल्यानंतर आजही रॉकेलचा दिव्याकरिता उपयोग केला जातो. सदर पूरवठा शासनाने तात्काळ सुरु करावा अशी मागणी आहे.

Web Title: Flood victims will get five liters of kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर