समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन

By Admin | Updated: September 25, 2016 00:48 IST2016-09-25T00:48:51+5:302016-09-25T00:48:51+5:30

वारंवार चर्चा, निवेदने, आंदोलने करूनही प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत.

Fix the problem, otherwise the movement | समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन

समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन

सीईओंना निवेदन : शिक्षक संघटना सरसावल्या
भंडारा : वारंवार चर्चा, निवेदने, आंदोलने करूनही प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. यापुढे शिक्षक अन्याय खपवून घेणार नाही, असा चंग बांधून जिल्हा परिषद अंतर्गत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना सरसावल्या आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी यासर्व संघटनांनी शिक्षककृती समिती गठित करून समस्यांचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे.
भंडारा जिल्हा अंतर्गत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक व कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना व महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ यांना मिळवून शिक्षक कृती समिती जिल्हास्तरावर गठित करण्यात आली आहे. यात सर्व जिल्हा संघटनांचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश करून शिक्षकांच्या व केंद्र प्रमुखांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्या संदर्भाने पुढाकार घेण्यात आला आहे. यात समितीने एकमताने निर्णय घेत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निराकरण न झाल्यास आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यात ५ आॅक्टोंबरपर्यंत प्रकरणे निकाली निघाल्यास ६ आॅक्टोंबरपासून कामबंद आंदोलन, धरणे, साखळी उपोषण, आमरण उपोषण करण्यात येणार आहे. उपशिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार व कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थानांतरण ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यात यावे, शालार्थ वेतनातील अनियमिततेची एप्रिल २०१४ पासून चौकशी करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
आजच्या सभेत रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, मुबारक सैयद, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, प्रमोद घमे, मुकूंद ठवकर, सुधीर वाघमारे, संदीप वहिले, हरिकिशन अंबादे, नेपाल तुरकर, सुधाकर ब्राम्हणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Fix the problem, otherwise the movement