शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांना आजीवन कारावास

By admin | Updated: September 30, 2014 23:31 IST

चोरीचा आळ लावून तुमसर येथील चैतराम सेवकराम भोंडेकर (३७) यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. शर्मा यांनी ५ आरोपींना आजन्म कारावासाची

तुमसर येथील खून प्रकरण : जिल्हा न्यायाधीशांचा निकालभंडारा : चोरीचा आळ लावून तुमसर येथील चैतराम सेवकराम भोंडेकर (३७) यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. शर्मा यांनी ५ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या सिल्ली येथील चैतराम सेवकराम भोंडेकर हे आपल्या कुटुंबासह मोलमजूरी करून राहत होते. १३ मार्च २०१३ ला रात्रीच्या सुमारास तुमसर येथील अंकुश भोंडेकर, नंदू बर्वेकर हे दोघे मोटारसायकलने त्याच्या घरी आले. त्यांनी चैतरामला अंकुश भोंडेकरच्या घरी आणले. यावेळी त्यांनी ४ हजार रुपये चोरून नेल्याचा त्याच्यावर आरोप लावला व हातपाय दोरीने बांधून त्याला लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या व हाताबुक्यांनी अमानुष मारहाण केली. यावेळी त्याने जीव वाचविण्यासाठी विनवण्या केल्या मात्र अंकुश भोंडेकर, त्याची पत्नी मंगला, नंदू बर्वेकर, नरेंद्र भोला यादव व बाळा राखडे यांनी त्याला बेदम मारहाण केली. रात्रभर मारहाणीनंतर त्याला पहाटेच्या सुमारास गावाला सोडून दिले. मरणासन्न अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. मृतकाची पत्नी वनमालाच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी कलम ३०२, ३६४, १४७, १४८, १४९ भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. याप्रकरणी तत्कालीन ठाणेदारांनी प्रकरण जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. शर्मा यांच्या न्यायालयात न्यायदानाकरिता न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी सर्व न्यायधीशांनी सर्व साक्ष पुरावे तपासून अंकुश, नंदू, नरेंद्र, बाळा व मंगला हे पाचही जण दोषी असल्याचे आढळून आल्याने त्यांना आजीवन कारावास व एक हजार रुपये दंडाची दि.२६ सप्टेंबर २०१४ ला शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने कठोर कारावासाची सजा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाकडून १८ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे अ‍ॅड.विवेक स्वामी व अ‍ॅड.सारंग कोतवाल यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाकडून अ‍ॅड.राजकुमार वाडीभस्मे यांनी काम पाहिले. (शहर प्रतिनिधी)