शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात सात उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

By admin | Updated: January 11, 2016 00:37 IST

नगर परिषद प्रभाग १ मधील पोटनिवडणुकीत रविवारी ६० टक्के मतदान झाले. निवडणूक शांततेत पार पडली.

आज मतमोजणी : उत्कंठा शिगेला, पिंपळगावातही रणधुमाळीतुमसर : नगर परिषद प्रभाग १ मधील पोटनिवडणुकीत रविवारी ६० टक्के मतदान झाले. निवडणूक शांततेत पार पडली. एकुण सात उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असुन सोमवारी मतमोजणी होणार आहे. नगरसेवकाच्या मृत्यूमुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.तुमसर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये रिक्त जागेकरिता रविवारी मतदान पार पडले. येथे एकूण सात उमेदवार निवडणुकीला उभे होते. यात गजभिये नितीन रमेश अपक्ष, गडपायले प्रमोद जनार्दन - राका, डहाट अधिर नानाजी - अपक्ष, भवसागर किशोर हरिराम - अपक्ष, वासनिक निलेश भिमराव - काँग्रेस, मेश्राम नवनाथ बाजू - कमळ, साठवणे अनिल - अपख यांचा समावेश आहे.एका वर्षानंतर निवडणूक पुढे असल्याने मतदार तथा राजकीय नेत्यात येथे उत्साह दिसला नाही. मोठे राजकीय नेते इकडे फिरकले नाही. उमेदवार व त्यांच्या समर्थकानीच येथे प्रचार केला. सोमवारी सकाळी १० वाजतापासून तुमसर नगरपरिषदेत मतमोजणी सुरु होईल. येथे ६० टक्के मतदान झाले. या प्रभागात एकूण मतदार ५७०२ इतके आहेत. प्रत्येक उमदेवारांने शेवटपर्यंत किल्ला लढविला. निकाल कुणाच्या बाजूने लागतो ते आज कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)पिंपळगाव पोट निवडणुकीत ६१.८४ टक्के मतदानलाखनी : तालुक्यातील पिंपळगाव (सडक) पंचायत समिती क्षेत्राची पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी ६१.८४ होती. एकुण ४९५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात स्त्रीयांची संख्या २४५९ आहे तर पुरुष मतदार २४९८ आहेत. चार उमेदवार निवडणुक रिंगणात आहे उद्या सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. निवडणुकीत काँग्रेसचे पंकज शामकुंवर, भाजपाचे सुबोध मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधिर मेश्राम, बसपाचे हर्षदिप गणविर निवडणुक रिंगणात होते. चारही उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले आहे. निवडणुक ११ मतदान केंद्रावर पार पडली. पिंपळगाव (सडक), खैरी, सामेवाडा, सेलोटी, रेंगेपार (कोहळी), चिचटोला, धाबेटेकडी येथील मतदारांनी मतदानकेले. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. काँग्रेसचे मुन्ना नंदेश्वर यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली.