शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: July 1, 2014 23:22 IST

आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली, पण कोंढा परिसरात दमदार पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या नजरा दररोज आकाशाकडे लागल्या आहेत. अनेकांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावलेले

कोंढा (कोसरा) : आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली, पण कोंढा परिसरात दमदार पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या नजरा दररोज आकाशाकडे लागल्या आहेत. अनेकांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावलेले पऱ्हे पावसाअभावी करपत चालले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात शेतकऱ्यांचे मुख्य पीक भात आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुुरुवात केली. अनेकांनी जूनच्या सुरुवातीस पऱ्हे टाकले. मृग नक्षत्रात पेरणीची कामे अनेकांनी आटोपले. आर्द्रा नक्षत्र २२ जूनपासून सुरू झाला तरी आठ दिवसांपासून एखादा पाऊसाचा सिरवा आला, त्या व्यतिरिक्त जोरदार पाऊस न पडल्याने सुरुवातीचे पऱ्हे वाया गेले आहेत. त्यामुळे दुबार पऱ्हे टाकण्याची पाळी अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. दररोज आकाशात ढग जमतात पण पाऊस दमदार येत नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी हात आवळले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी खर्च करणे कमी केले आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास जवळील पैसा पुरला पाहिजे म्हणून दुकानातील खरेदीवर हात आखूड केले आहे. किराणा व आवश्यक खरेदी फक्त शेतकरी करताना दिसते आहे. सध्याच्या परिस्थितीचा प्रभाव बाजारपेठावरदेखील झाले आहेत. त्यामुळे सर्वच नागरिक दररोज आकाशाकडे पाहत असून जोरदार पाऊस आल्यास शेतकरी आनंदीत होतील. सध्या मात्र शेतकरी चिंतातुर असून येत्या आठवड्यात जोरदार पाऊस न पडल्यास परिस्थिती बिकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)