शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले धान खरेदी केंद्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

नवेगावबांध : अर्जुनी मोर तालुक्यातील तालुका खरेदी-विक्री सेवा संस्था व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धान ...

नवेगावबांध : अर्जुनी मोर तालुक्यातील तालुका खरेदी-विक्री सेवा संस्था व आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धान खरेदी-विक्री अद्यापही सुरू झाली नाही. ३० एप्रिलपर्यंत आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी नोंदणी करावी, अशी सूचना शेतकऱ्यांना देण्यात आली होती; परंतु आधारभूत धान खरेदी केंद्रांवर कुठल्याही प्रकारची अद्याप नोंदणी करण्यात आली नाही. त्यामुळे धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तालुका खरेदी-विक्री सेवा संस्थेने व आदिवासी सहकारी संस्था यांच्यामार्फत शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. खरीप हंगामातील धान खरेदीमुळे तालुक्यातील गोदामे आधीच हाऊसफुल्ल आहेत. व्यापाऱ्यांनी धानाची भरडाईसाठी उचल केली नसल्यामुळे गोदामे हाऊसफुल्ल आहेत. धानाच्या भरडाईचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आमदार मनोहर चंद्रिकापुरे व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण सचिव विलास पाटील व संबंधित अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ३१ मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात व्यापारी धान उचल करून, रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. पावसाळ्यात धान खरेदी जर सुरू झाली, तर शासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत गोदामातील धान उचलत नाही तोपर्यंत गोदामे भरलेलीच राहणार. मग रब्बी हंगामातील धानाची खरेदी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

खरेदी केंद्राबाहेर धान पडून

शासकीय आधारभूत धान खरेदी-विक्री केंद्राबाहेर मागील १५ दिवसांपासून कित्येक शेतकऱ्यांचे धान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपयार्डात पडून आहेत. काही शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत धान घरीच ठेवले आहेत. उन्हाळ्याचा आता शेवटचा टप्पा असून, लवकरच येणाऱ्या मृग नक्षत्रात खरीप हंगामाकरिता लागणारे साहित्य, बी-बियाणे, नांगरणी, रोवणी खर्च कसा करायचा? हा प्रश्न हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

नवेगावबांध येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीतील शासकीय आधारभूत केंद्रांवर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणून ठेवलेले धानाचे पोते.