शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखली प्रवासी रेल्वे

By admin | Updated: October 6, 2015 00:43 IST

बावनथडी प्रकल्प वितरिकेला रेल्वे प्रशासन रेल्वे क्रॉसिंगची परवानगी देत नसल्यामुळे शेकडो शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

महकेपार येथील घटना : तीन तास रेल्वे रोखलीतुमसर : बावनथडी प्रकल्प वितरिकेला रेल्वे प्रशासन रेल्वे क्रॉसिंगची परवानगी देत नसल्यामुळे शेकडो शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. याचा निषेध करण्याकरिता मध्यप्रदेशातील दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास महकेपार रेल्वे स्थानकावर प्रवाशी रेल्वेला तीन तास रोखून धरले. तिरोडी-तुमसर रेल्वे क्रमांक ५८८१६ (टी.टी.) सकाळी ८.१५ वाजता तिरोडी रेल्वे स्थानकावरून महकेपारकडे रवाना झाली. १० कि़मी. अंतरावर महकेपार रेल्वे स्थानकावर परिसरातील दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानकाला घेराव केला. रेल्वे चालकाला रेल्वे ट्रॅकवर खूप मोठा जनसमुदाय दिसला. प्रवाशी रेल्वे चालकाने रेल्वे स्थानकाच्या बाहेर आऊटरवर थांबविली. आंजनबीटी, दिगरा व कोडंबी येथील शेतकऱ्यांचा यात समावेश होता.शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी पाहिजे. एका पाण्यामुळे धानपीक हातचे जाण्याची शक्यता आहे. बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाच्या वितरिकेचे काम रेल्वे ट्रॅकपर्यंत पूर्ण झाले आहे. पलीकडे रेल्वे क्रॉसिंगची परवानगी रेल्वे प्रशासन देण्यास टाळाटाळ करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी रेल्वे रोको करण्याचा निर्धार केला. यापुढे मोठे आंदोलन करण्याचा ईशारा शेतकऱ्यांनी दिला. दीड तासानंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान आंदोलन उग्र झाले होते. येथे अनुचित घटना घडण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे तिरोडी येथील रेल्वे मास्तरने प्रवाशी गाडी का सोडली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महकेपार येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिरोडी येथे आंदोलक जमा असल्याची माहिती कां? दिली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. (तालुका / शहर प्रतिनिधी)तुमसर रोड येथे तुमसर-तिरोडी रेल्वे प्रवाशी गाडी सकाळी ९.१५ वाजता येण्याची वेळ असून रेल्वे रोकोमुळे ती दुपारी १२.१५ वाजता आली. रेल्वे रोखण्याचे सविस्तर कारण मला माहित नाही. अधिक माहितीकरिता रेल्वे अभियंत्यांशी संपर्क साधा. -आर.जी. भोवते, स्टेशन प्रबंधक तुमसर रोड.या प्रकरणाची मला माहिती देता येणार नाही. याकरिता नागपूर येथील दक्षिण पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करा.-एच. हरीश, रेल्वे उपअभियंता तुमसर रोड.