शेतकऱ्यांनी संधीचे सोने करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:22+5:302021-02-05T08:39:22+5:30

साकोली : आर्थिक अडचण व शासकीय धान खरेदी केंद्रावर लागणाऱ्या प्रदीर्घ वेळेमुळे शेतकरी धानाची विक्री खासगी धान विक्रेत्यांना कमी ...

Farmers should seize the opportunity | शेतकऱ्यांनी संधीचे सोने करावे

शेतकऱ्यांनी संधीचे सोने करावे

साकोली : आर्थिक अडचण व शासकीय धान खरेदी केंद्रावर लागणाऱ्या प्रदीर्घ वेळेमुळे शेतकरी धानाची विक्री खासगी धान विक्रेत्यांना कमी दरात विक्री करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना धानाचा उत्पादन खर्चही मिळत नव्हता. त्यामुळे शासनाने ही अडचण दूर करण्यासाठी व शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी ठिकठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्राची सोय करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संघीचे सोने करून धान शासकीय धान खरेदी केंद्रातच द्यावे़ जेणेकरून धानाला शासकीय दर मिळून शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळेल, असे मत कुंभलीच्या सरपंच कमला भेंडारकर यांनी व्यक्ते केले. त्या दुर्गामाता अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्यादित कुंभलीच्या शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र कुंभलीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी केंद्राचे अध्यक्ष मिताराम भेंडारकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष भोजराम भेंडारकर, शांताराम भेंडारकर, माजी सरपंच खुमचंद भेंडारकर, झाशीराम शेंडे, माजी सरपंच हरी शिवणकर उपस्थित होते. दुर्गामाता अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्यादित कुंभली अंतर्गत कुंभली येथे धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली असून या केंद्राअंतर्गत कुंभली, धर्मापुरी व साखरा या तीन गावांच्या शेतकऱ्यांना धान विक्री करता येणार आहे.

Web Title: Farmers should seize the opportunity