शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले

By admin | Updated: June 11, 2015 00:32 IST

मागील वर्षीची नापिकी, दुष्काळ, उचललेल्या कर्जाची परतफेड, रबी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने, निसर्गाचा ...

पावसाची प्रतीक्षा : हवामानावर बळीराजाची नजर, यांत्रिक शेतीचा फटका, खतांच्या किमती गगनाला भिडल्या, बोगस बियाणे बाजारात दाखलमासळ : मागील वर्षीची नापिकी, दुष्काळ, उचललेल्या कर्जाची परतफेड, रबी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने, निसर्गाचा लहरीपणा यासह अन्य बाबींमुळे शेतकऱ्यांचे तूर्तास खरीप हंगामाचे आर्थिक व इतर नियोजन बिघडल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागातील लग्नसराई जवळपास संपली आहे. लगेच रोहिणी नक्षत्र सुरू झाले. परंतु मशागतीला पूरक असा पाऊस न पडल्याने शेतकरी खरिपाच्या हंगामाकरिता संभ्रमावस्थेत सापडला आहे. गेल्या दोन तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने वातावरणातील तापमान कमालीचे घटले. त्यामुळे शेतकऱ्याला एक आशेचा किरण झळकला. लगेच खरिपासाठी शेतजमिनी तयारीला लागला. परंतु लहरी व बेभरवशाच्या पावसाने पाठ फिरवली व तापमानात पुन्हा वाढ झाली. मौसमी वाऱ्यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही विलंब केला ते आपल्यापर्यंत पोहचतील की नाही, याचीही शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. रोहिणीचा हलका पाऊस जरी झाला तरी शेतकरी मृगामध्ये धुळपेरणीस हिम्मत करतो. मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे यावर्षी सुद्धा धुळपेरणी करावी की नाही, या विवंचनेत सध्या शेतकरी गुरफटला आहे. बहुतांशी शेतकरी दुबार पेरणी टाळण्यासाठी चिखलपेरणी म्हणजे खारी घोटून पऱ्हे भरण्याच्या विचारात आहेत. तर काही शेतकरी आवत्या म्हणजे बाशी करण्याच्या तयारीत आहेत. परंतु इथेही शेतकरी भीतीने ग्रासला आहे. कारण रोहिणीचा पाऊस पडला तर कचरा, तण काढण्यास शेतकऱ्यांना सोयीचे होते परंतु रोहिणी नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असताना हवामान खात्याचे अंदाज मात्र, शेतकऱ्यांच्या नियोजनात बाधा आणत आहेत. करावे तरी काय, सध्या पेरणीबाबत तर नियोजन बिघडल्याचेच दिसत आहे.जमिनीचा पोत टिकून राहावा, किडीचा प्रादुर्भाव जास्त होवू नये यासाठी शेतकऱ्यांचा शेणखताचा वापर अधिक करण्याकडे कल असतो. परंतु दिवेंदिवस घटत चाललेला पशुधन, चारा टंचाई, पशुखाद्यांच्या वाढत्या किंमती व ट्रॅक्टर व यांत्रिकशेती पद्धती यामुळे पाळीव प्राण्यांची संख्या घटत आहे. पर्यायाने शेणखत सुद्धा दुर्मिळ होत चालला आहे. शेतीला पुरक असा दुग्ध व्यवसाय सुद्धा, दुधाला योग्य भाव नसल्याने परवडत नाही. आणि म्हणून दुभत्या जनावरांची संख्या घटलेली आहे. पर्यायाने शेणखताला सोन्याच्या भावात खरेदी करावा लागत आहे. उत्पादन वाढीसाठी नाईलाजास्तव शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर करावा लागतो आहे. परंतु त्यांच्याही किंमती गगनाला भिडल्याने, शिवाय किटकनाशकांच्या किंमती आवाक्या बाहेरच्या असल्याने आर्थिक नियोजन सुद्धा बिघडण्याची दाट शक्यता पसरली आहे.संकरित बियाणांचे पेव फुटले आहे. शासकीय यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शनाअभावी बोगस बियाणांना बळी पडण्याचा नेहमीचाच अनुभव शेतकऱ्यांना आहे.अशा वेळी घरच्या शेतीत स्वत: तयार केलेले बियाणे वापरावे की, बाजारातील तथाकथित नामांकित कंपन्यांचे बियाणे वापरावे याबाबतीत सुद्धा शेतकरी योग्य नियोजन करण्यात असमर्थ ठरत आहे. माती परीक्षण प्रत्येक शेतकऱ्यांना शक्य नसल्याने कोणता वाण वापरावा, खते किटकनाशके यांचा वापर कसा व किती करायचा, पाणी पुरवठ्याचे साधनांचा अभाव, क्षीण निर्णय क्षमता अशा अनेक समस्यांनी शेतकऱ्यांच्या मनात घर केलेले आहे. त्यामुळे तूर्तास अनेक शेतकरी आर्थिक कोंडीत आहेतच शिवाय खरिपासाठी नियोजन कसे करावे, याही विवंचनेत सापडला आहे. सध्यातरी मृगधारा बरसण्यापर्यंत शेतकऱ्यांचे नियोजन बिघडलेले दिसून येत आहे. (वार्ताहर)