शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीसाठी शेतकरी सज्ज : पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

खरीप हंगामात मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे. या नक्षत्रात पेरणी झाली तर उत्पादनातही वाढ होते. त्यामुळेच अनेक शेतकरी मृग ...

खरीप हंगामात मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे. या नक्षत्रात पेरणी झाली तर उत्पादनातही वाढ होते. त्यामुळेच अनेक शेतकरी मृग नक्षत्रात पेरणीला भर देतात. मागील वर्षीपासून सुरू असलेल्या काेरोना प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याहीवर्षी काेरोनाचे सावट असताना शेतकऱ्यांनी महिन्याभरापासून खरिपाची तयारी सुरू केली आहे. आजघडीला पेरणीसाठी शेत जमीन सज्ज असताना पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

यावर्षी जिल्ह्यातील २ लाख ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात खरीप लागवडीचे प्रस्तावित क्षेत्र आहे. यामध्ये १ लाख ९३ हजार ७०० हेक्टरमध्ये धान तर १३ हजार ८०० हेक्टरमध्ये तूर पिकाची लागवड होणार आहे. जिल्ह्यात साधारणतः ५ टक्के शेतकऱ्यांकडे पाण्याची साधने आहेत. अशा शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला आहे. तर उर्वरित शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जमिनीत ओलावा नाही. जमिनीत ८० ते १०० मिमी. पावसाचा ओलावा असल्याशिवाय पेरणी करण्याला मर्यादा येत आहेत. यावर्षी बी-बियाणे, रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली. परंतु, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तथापि, पेरणीसाठी सज्ज झाला असून १५ जूनपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पावसाचा अंदाज असून त्यानंतरच पेरणीला प्रारंभ करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बोनससाठी तारीख पे तारीख

खरीप हंगाम सुरू झाला तरी मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे बोनस राज्य सरकारने अद्याप दिले नाहीत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सुमारे १४०० कोटींचा बोनस शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. बोनस आज मिळेल, उद्या मिळेल, लवकरच मिळेल, असे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे पुढारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. महाग झालेले बी-बियाणे, रासायनिक खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता पैशांची गरज आहे. परंतु, सरकारकडून बोनस बाबत आश्‍वासने देऊन बोळवण केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.