शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील धान कापणीचे शेतकरी नावच घेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:20 IST

पावसाने दगा दिल्याने उद्ध्वस्त झालेला शेतातील धान कापणीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरी अंगावर बसण्याच्या भीतीने शेतकरी कापणीचे नावच घेत नाही. जिल्हाभरात शेकडो हेक्टरवर धान कापणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने मध्यम दुष्काळ घोषित करताना भंडारा जिल्ह्यात दुजाभाव केल्याने यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : मजुरी अंगावर बसण्याची भीती

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : पावसाने दगा दिल्याने उद्ध्वस्त झालेला शेतातील धान कापणीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरी अंगावर बसण्याच्या भीतीने शेतकरी कापणीचे नावच घेत नाही. जिल्हाभरात शेकडो हेक्टरवर धान कापणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने मध्यम दुष्काळ घोषित करताना भंडारा जिल्ह्यात दुजाभाव केल्याने यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहे.भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाअभावी धान शेती नेस्तनाबूत होत आहे. मात्र दरवर्षी त्याच उमेदीने शेतकरी शेतात रोवणी करतात. यंदाही सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रोवणी केली. मध्यंतरी समाधानकारक पाऊसही झाला. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली ती कायमची. वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे धानपिक शेतातच वाळून गेले. ९० टक्के सिंचनाचा दावा करणाऱ्या प्रशासनाने प्रकल्पाचे पाणी योग्यवेळी धानासाठी सोडले नाही. परिणामी जिल्ह्याभरातील शेकडो हेक्टरवरील धान शेतातच वाळला. शेतात जावून बघीतल्यास धानाच्या लोंब्या भरल्या नसल्याचे दिसून येते. हाती काहीच पीक येणार नाही, मजूरी अंगावर बसेल अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे साकोली तालुक्यासह जिल्ह्याभरातील शेतात धानाचे पीक उभे आहे. निम्न प्रतीचा धान काढण्याची ही वेळ आहे. परंतु बहुतांश शेतकरी पिकाची अवस्था पाहून धान काढण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.आधीच कर्जाचा डोंगर त्यात मजूरीचेही पैसे अंगावर कशाला बसून घ्यायचे असा सवाल थेट शेतकरी करीत आहे. धान कापूनही घरी काय तणस न्यायचे काय? असे शेतकरी म्हणत आहे. एकंदरीत यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गडद सावट आहे. मात्र शासनाने मध्यम दुष्काळ घोषीत करताना केवळ तीन तालुक्यांचा समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यात रोष व्यक्त होत आहे. शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.मध्यम दुष्काळाच्या घोषणेत दुजाभावशासनाने राज्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित केला. त्यात भंडारा जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्याचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान साकोली तालुक्यात असताना शासनाने केवळ पावसाच्या आकडेवारीवरुन तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. खरे तर संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या यादीत अपेक्षीत आहे. मात्र अद्यापपर्यंत शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही.सिंचन प्रकल्प ठरले पांढरा हत्ती ?जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरले आहे. साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद प्रकल्पाचे काम सुरु आहे. यावर्षी या प्रकल्पाचे पाणी सावरबंध, कुंभली, खंडाळा, शिवनीबांध या तलावात सोडण्यात आले. मात्र तेही समाधानकारक नाही. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतर प्रकल्पाची असून हे प्रकल्प शेतकऱ्यासाठी पांढरा हत्ती ठरले.