शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 25, 2014 01:02 IST

हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम तालुका स्थळापर्यंत दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाली आहे.

पालांदूर : हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा व महत्वाचा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीची धूम तालुका स्थळापर्यंत दिसून येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुल्ल झाली आहे. या सर्व धामधुमीत मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या घरात बसून असल्याचे दृश्य आहे. हाती पैसा नसल्याने खरेदी तर दूरच दोन वेळच्या जेवणासाठी तो चिंतातुर आहे. एकंदर जगाच्या पोशिंद्याची दिवाळी अंधारातच गेली आहे. दिवाळी म्हटली की, नवनवीन वस्तूंची खरेदी आली. त्यानुसार बाजारपेठ गर्दीने फुगून गेली आहे. आमगाव या तालुकास्थळीही बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. ही गर्दी दिसून येत आहे ती शासकीय अधिकारी, कर्मचारी व व्यवसायीकांची. मात्र अवघ्या देशासह तालुक्याची अर्थव्यवस्था चालविणारा शेतकरी या गर्दीतून नदारद असून तो घरीच बसला आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना धानाची दुबार पेरणी करावी लागली. धानाला उशीर झाल्याने पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. बँक व सावकारांचे कर्ज डोक्यावर असताना उत्पादनाची आस धरून शेतकऱ्यांनी पुन्हा कर्जाचा डोंगर उचलला व शेतीची मशागत केली. काही ठिकाणी रोवण्या खोळंबल्याचा फटका उत्पादनाला बसला आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये हलका धान शेतकऱ्याच्या हाती लागतो. शेतकरी कसाबसा दिवाळी साजरी करायचा. परंतु यावर्षी मात्र हलके धानही शेतकऱ्याच्या हाती लागले नसल्याने शेतकरी रिकाम्या हातीच आहे. चौरास भागात हलक्या धान कापणीला प्रारंभ झालेला आहे. हातात पैसा खेळणार कसा या विवंचनेत दिवाळीचा सण निघून गेला.दिवाळीत कपडे, दागिने व चैनीच्यावस्तूंची खरेदी केली जाते. मात्र ही खरेदी फक्त अल्पशा कुटुंबातच केली जात असल्याचे दिसून येत आहे. तर शेतकरीवर्गाकडे लक्ष्मीपूजनासाठीही लक्ष्मी नसल्याने त्यांची दिवाळी थंड गेली. शेतकऱ्यांना फक्त शेतमालाच्या उत्पादनातूनच हे सर्व शक्य आहे. शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीला बोनस मिळतो. व्यापारीही आपल्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल करून मालामाल होतात. परंतू उभ्या जगाचा पोशिंदा मात्र आपली दिवाळी अंधारातच साजरी करतो. आम्हाला बोनस कधी मिळणार व तो कोण देणार, सरकार की निसर्ग अशी आर्त हाकही तो मारू शकत नाही ही व्यथा आहे. (वार्ताहर)