शेतकरी स्वप्निल नंदनवार सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:57+5:302021-02-05T08:40:57+5:30

खराशी : परंपरागत पद्धतीला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली, तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे ...

Farmer Swapnil Nandanwar honored | शेतकरी स्वप्निल नंदनवार सन्मानित

शेतकरी स्वप्निल नंदनवार सन्मानित

खराशी : परंपरागत पद्धतीला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची जोड दिली, तर शेती ही अजूनही उत्तम उत्पन्न देत असल्याचे दाखवून देणाऱ्या पालांदूर येथील स्वप्निल शंकरराव नंदनवार या तरुण प्रगतशील शेतकऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घेत, आरसीएफतर्फे सन्मानित करण्यात आले. नागपूर व अमरावती विभागातील उल्लेखनीय विक्री करणाऱ्या विक्रेता बंधूंचा, तसेच प्रगतशील शेतीचा अवलंब करून उत्कृष्ट शेतमाल उत्पादन काढणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक व प्रबंध निदेशक श्रीनिवास मुडगेरिकर यांनी शेतकरी बंधूंना शुभेच्छा दिल्या. सदर सन्मान मुख्य प्रबंधक एम.एच. पटेल यांच्या हस्ते नागपूर विभागातील प्रगतशील शेतकरी जिल्ह्यातील पालांदूर येथील स्वप्निल शंकरराव नंदनवार यांना देण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रबंधक प्रकाश पाठक, उपप्रबंधक राजशेखर साखरे, पवन शंकर आदी उपस्थित होते. संचालन भारती पाठक यांनी तर आभारप्रदर्शन राजशेखर साखरे यांनी केले.

Web Title: Farmer Swapnil Nandanwar honored