शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल गावात दुर्गंधीची समस्या

By admin | Updated: April 21, 2015 00:24 IST

लाखांदूर तालुक्यातील निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बारव्हा गावाची ओळख सर्वत्र आहे.

व्यथा बारव्हा गावाची : नागरिकांचे आरोग्य धोक्यातबारव्हा : लाखांदूर तालुक्यातील निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बारव्हा गावाची ओळख सर्वत्र आहे. एकेकाळी याच गावाने स्वच्छतेकडून समृद्धीकडे या महामंत्राचा बोध घेत गावालगत स्वच्छता अभियान राबवून निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त केला होता. मात्र आजघडीला बारव्हा गावात घाणीचे साम्राज्य वाढले असून दुर्गंधीमय वातावरणामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.गावाच्या सिमेवर येताच येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्याला होणारा अपाय रोखण्यासाठी शासनाच्या वतीने हागणदारीमुक्तीसाठी सन २००० पासून स्वच्छता अभियान सुरु केले. या अभियानाला १५ वर्षाचा कालावधी लोटला असताना गावाच्या सीमेवर येताच येणारी हागणदारीची दुर्गंधी कायमच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त गाव संकल्पनेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.राज्य शासनाने कर्मयोगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २००० पासून राबविण्याची योजना मोठ्या गाजावाज्यांनी अमलात आणली. यानुसार कायम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. त्यांच्याकडून या माध्यमातून अंमलबजावणी सुरु झाली. मात्र गावात असलेली उघड्यावरील हागणदारी अजूनही मुक्त झाली नाही. या कामात शासकीय यंत्रणा कुठे कमी पडत आहे ही संशोधनाची बाब ठरत आहे.गावात येत असलेल्या या दुर्गंधीमुळे अनेकांना असाध्य रोगाच्या आहारी जावे लागल्याचे अनेकदा समोर आले आहे. या कारणाने ग्रामीण भागात उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर लोकांना शौचालय बांधावीत यासाठी अनुदानही देण्यात आले. शिवाय त्यांचा वापर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र शासनाचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरल् याचे समोर येत आहे. या प्रकाराला स्थानिक प्रशासन तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनेचा मागोवा घेतल्यास अनेकांनी ती केवळ नावापुरतेच या योजनेत सहभाग नोंदविल्याचे समोर येत आहे. शासनाकडून अनुदानाचा लाभ घेऊन बांधलेल्या या शौचालयात नागरिकांकडून गोवऱ्या, काड्या व टाकावू वस्तू ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. तर काही शौचालयाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे त्याचा वापरात नसल्याचे दिसून आले. १०० टक्के नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम केल्याचे कागदी घोडे नाचवून निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त केला. मात्र आजही ५० टक्के नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याने बारव्हावासीयांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा गावासह परिसरातील चिचाळ, तावशी, चिकना, बोथली, धर्मापुरी, कोच्छी, बोथली, दहेगाव, दांडेगाव आदी गावात उघड्यावर प्रात:विधी केला जातो. ग्रामीण भागतात शौचालयाचा वापर कोहत नाही.घरी शौचालय असतानादेखील बहुतांश लोक त्याचा वापर करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थितीत बदल झालेला नाही. अस्वच्छतेमुळे परिसरात आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सदर बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे. (वार्ताहर)