शासकीय धान खरेदीला महिनाभर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:27+5:30

अपुऱ्या यंत्रणेने आणि अवकाळी पावसाने धान खरेदी झाली नाही. त्यातच ३१ मार्च रोजी शासकीय धान खरेदी बंद होणार होती. दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्गाची भीती निर्माण झाली. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. धान खरेदी केंद्रावरही शुकशुकाट निर्माण झाला होता. शेतकऱ्यांकडे ४० टक्के धान शिल्लक आहे. आपल्याकडील धान विकला जाईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना होती.

Extension of Government Paddy Procurement throughout the month | शासकीय धान खरेदीला महिनाभर मुदतवाढ

शासकीय धान खरेदीला महिनाभर मुदतवाढ

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : आमदारांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्राला आता महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. खरेदी ३१ मार्च रोजी संपणार होती. मात्र शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला धान लक्षात घेता केंद्र सरकारने ३० एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी विधानसभा अध्यक्ष आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.
भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात यंदा मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले आहे. विविध कारणाने धान खरेदी रखडली. राज्य सरकारने प्रतीक्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केल्याने शासकीय केंद्रावर मोठी आवक वाढली. अपुऱ्या यंत्रणेने आणि अवकाळी पावसाने धान खरेदी झाली नाही. त्यातच ३१ मार्च रोजी शासकीय धान खरेदी बंद होणार होती. दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्गाची भीती निर्माण झाली. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. धान खरेदी केंद्रावरही शुकशुकाट निर्माण झाला होता. शेतकऱ्यांकडे ४० टक्के धान शिल्लक आहे. आपल्याकडील धान विकला जाईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना होती.
आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून सरकारकडे धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली. आमदारांच्या आग्रही मागणीमुळे केंद्र सरकारने हमीभाव खरेदी केंद्रांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Extension of Government Paddy Procurement throughout the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.