चार तालुक्यासह १९ मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:01+5:30

गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. मात्र रविवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरूवात झाली. सोमवारीही संततधार पाऊस कोसळत होता. या पावसाने धान पिकाला मोठा दिलासा मिळाला. मात्र अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने धान धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

Excessive rainfall in 19 circles including four talukas | चार तालुक्यासह १९ मंडळात अतिवृष्टी

चार तालुक्यासह १९ मंडळात अतिवृष्टी

Next
ठळक मुद्दे२४ तासात ७३.४ मिमी पाऊस : सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात १०५.८ मिमी, शेतशिवारात शिरले पुराचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू असून चार तालुक्यासह १९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. गत २४ तासात ७३.४ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात १०५.८ मिमी नोंदविला गेला. या पावसाने काही भागात धान पिकाला दिलासा मिळाला असला तरी अनेकांच्या बांधीत पाणी शिरल्याने धान पीक धोक्यात येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसे प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून नदीतीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. मात्र रविवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरूवात झाली. सोमवारीही संततधार पाऊस कोसळत होता. या पावसाने धान पिकाला मोठा दिलासा मिळाला. मात्र अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने धान धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त होत आहे. जिलह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून दहा आॅगस्टपर्यंत ७७२.१ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र सध्या जिल्ह्यात ६८७.३ मिमी पाऊस कोसळला असून तो या कालावधीच्या सरासरीच्या ८९ टक्के आहे. विश्ोष म्हणजे दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने सरासरीत वाढ झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ७३.४ मिमी पाऊस कोसळला असून त्यात साकोली, मोहाडी, तुमसर आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. साकोलीत १०५.८ मिमी, तुमसरमध्ये ९८ मिमी, मोहाडी ९५ मिमी, लाखनी ८६ मिमी, भंडारा ५४ मिमी, पवनी २९.७ मिमी, लाखांदूर ४४.१ मिमी पाऊस कोसळला. भंडारा तालुक्यातील शहापूर, धारगाव, पहेला आणि खमारी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मोहाडी तालुक्यातील मोहाडी, करडी, कांद्री, कन्हाळगाव, आंधळगाव. तुमसर तालुक्यातील तुमसर, सिहोरा, मिटेवानी, गर्रा. पवनी तालुक्यातील अड्याळ, साकोली तालुक्यातील साकोली, एकोडी तर लाखनी तालुक्यातील लाखनी, पोहरा पिंपळगाव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिलह्यातील ३४ पैकी १९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून मोहाडी तालुक्यातील वरठी वगळता सर्व महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
लाखांदूर तालुक्यात चार पुलावरून पाणी
लाखांदूर तालुक्यातील चुलबंध नदीला पूर आल्याने भागडी-चिंचोली, मांडळ-दांडेगाव, धर्मापूरी-बोथली, बारव्हा-तई आदी पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
सोमवारीही रिमझिम पाणी बरसत होता. काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून वैनगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास चुलबंद नदीचा प्रवाह मंदावतो आणि ओढे नाल्यांना पूर येतो.

वैनगंगा नदी तीरावरील गावांना सर्तकतेचा इशारा
गोसे प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. सकाळी याप्रकल्पाचे २९ गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. मात्र दुपारी ३ वाजता या प्रकल्पाचे ३० दरवाजे अर्धा मीटरने तर तीन दरवाजे एक मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता या प्रकल्पाचे १४ गेट अर्धा मीटरने तर १९ गेट एक मीटरने उघडले. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

Web Title: Excessive rainfall in 19 circles including four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी