शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळ होताच भरते मद्यपींची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणाऱ्यांना कुणाचेही भय नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येते. शास्त्रीचौकासह भंडारा शहरातील मुख्य चौकांमध्ये हा प्रकार गत काहि महिण्यांपासून राजरोसपणे सुरु असताना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास तरुणींसह महिलांना होत आहे.

ठळक मुद्देमहिला असुरक्षित : भंडारा शहरातील प्रकार, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

न्यूज नेटवर्क
भंडारा : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून दारुची अवैध विक्री करणाऱ्यांनी शहरात हैदोस घातला आहे. भंडारा शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी सायंकाळ होताच मद्यपींची जत्राच भरत असल्याचे चित्र आहे. अर्थातच यासाठी पोलिसांचे पाठबळ लाभत असल्याची शहरात चर्चा आहे.
शहरातील शास्त्री चौक परिसर, दसरा मैदान, गणेशपूर मार्ग, मिशन शाळा परिसर, मुस्लिम लायब्ररी चौक, महात्मा गांधी चौक परिसर, मेंढा, वैनगंगा नदीघाट, शुक्रवारी भागात मोठ्या प्रमाणात दारुची अवैध वाहतुकीसह विक्री होत आहे. खुलेआम होत असलेल्या या दारु विक्रीला अभय नेमके कुणाचे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
रस्त्याच्या कडेला उभे राहून दारु पिणाऱ्यांना कुणाचेही भय नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येते. शास्त्रीचौकासह भंडारा शहरातील मुख्य चौकांमध्ये हा प्रकार गत काहि महिण्यांपासून राजरोसपणे सुरु असताना पोलीसांच्या दुर्लक्षामुळे याचा त्रास तरुणींसह महिलांना होत आहे. पोलीस मात्र या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
रस्त्यावर उभे राहून मद्य प्राशन केले जात असल्याने रस्त्याने जावे तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी सामाजिक संतुलन बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कानाडोळा केला जात असल्याने संशयाच्या भुवया उंचावल्या जात आहेत.

मोठा बाजार परिसरातही दारु विक्री
शहरातील हृदयस्थळी वसलेल्या मोठा बाजार परिसरातही दारुची विक्री होत असल्याचे खुलेआम चित्र आहे. विशेष म्हणजे मद्यपींना विशेष सुविधाही दिली जाते. दारु पिण्यासाठी लागणाºया चकन्यासह ग्लास, थंड पाण्याची बॉटल याचीही तिथे सुविधा असते. बहुतांशपणे मद्यप्राशन करणारे दारु सोबतच घेऊन येतात. दारु प्यायल्यानंतर शिवीगाळ करणे, जोरजोरात बोलणे असा प्रकारही घडत असतो. मात्र वेळीच परिस्थिती सांभाळून घेत पोलिसांसोबतही सेटींग केली जाते. या परिस्थितीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.

टॅग्स :Socialसामाजिक