शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांची विरूगिरी

By admin | Updated: February 27, 2017 00:26 IST

कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे सर्व यासाठी साकोली येथे चार दिवसांपासुन अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समिती साकोलीतर्फे आमरण उपोषण सुरु आहे.

प्रकरण भारनियमनाचे : उपोषणाचा चवथा दिवससाकोली : कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे सर्व यासाठी साकोली येथे चार दिवसांपासुन अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समिती साकोलीतर्फे आमरण उपोषण सुरु आहे. आज शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकामधील तिघांनी चक्क नागझिरा रोड साकोली येथील जलकुंभावर चढून विरूगिरी केली.कृषी पंपाचे भारनियमन बंद करावे यासाठी विजवितरण कंपनीसमोर मागील चार दिवसांपासून महिला व पुरुष शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तालुक्यात भारनियमनाचे संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे. मात्र या आंदोलन मंडपाला खा. नाना पटोले, बाळा काशिवार यांनी भेट दिली नाही. समस्याही जाणून घेतल्या नाही. त्यामुळे आंदोलनकाऱ्यांच्या भावना तिव्र झाल्या, परिणामी आज दुपारी अविनाश ब्राम्हणकर, अखिलेश गुप्ता व विनायक देशमुख या तिघांनी जलकुंभावर चढुन शासन व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात नारेबाजी सुरु केली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. चर्चेच्या माध्यमातून जलकुंभावर चढलेल्या आंदोलकांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चेला यश आले नाही. परिस्थिती सांभाळण्यासाठी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार मडावी हे स्वत: जलकुंभावर चढून आंदोलनकारीची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या वरिष्ठापर्यंत पोहचवून तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावर आंदोलक चार तासांनी जलकुंभावर उतरले. तसेच पुन्हा वीज कार्याल्यासमोर सुरु असलेल्या मंडपात जाऊन आमरण उपोषण सुरु केले. शहरात मात्र आंदोलनकर्त्यांच्या विरूगीरीची चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)