ईरीच्या शास्त्रज्ञांनी साधला धान उत्पादकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:01:14+5:30

शेतकऱ्यांकडून धान लागवड व विक्री विषयी चर्चा केली. त्यानंतर गणेशपूर येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देत शेतकऱ्यांना एकत्रित आणून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. लाखनी, साकोली येथील निवडूक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत साकोली कृषी विज्ञान केंद्राचा आढावा घेतला. खासदार सुनील मेंढे यांनी जिल्ह्यातील धान पीक उत्पादन व शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यांविषयी शास्त्रज्ञांना माहिती दिली.

Eri scientists interact with paddy growers | ईरीच्या शास्त्रज्ञांनी साधला धान उत्पादकांशी संवाद

ईरीच्या शास्त्रज्ञांनी साधला धान उत्पादकांशी संवाद

Next
ठळक मुद्देदोन दिवसीय दौरा : पट्टा पद्धतीसह बाजारपेठेबद्दल जाणून घेतली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी बाजारपेठ जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानी जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या दौऱ्यावेळी खासदार सुनील मेंढे, वाराणसी येथील अंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राचे संचालक अरविंद कुमार यांच्यासह जिल्हाधिकारी एम. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुमेश्वरी, गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षक गणेश घोरपडे, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. विलास खर्चे, भंडारा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकर डॉ. जी.आर. श्यामकुंवर, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ निलेश वझिरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील धान पिकाच्या तंत्रज्ञान तसेच पीक पद्धतीचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्राच्या पाच सदस्यीय टीमनी भंडारा तालुक्यातील खमारी येथील रामभाऊ खोब्रागडे यांच्या पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या धान पिकाची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी पट्टापद्धतीविषयी पथकाला माहिती दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून धान लागवड व विक्री विषयी चर्चा केली. त्यानंतर गणेशपूर येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देत शेतकऱ्यांना एकत्रित आणून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. लाखनी, साकोली येथील निवडूक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत साकोली कृषी विज्ञान केंद्राचा आढावा घेतला. खासदार सुनील मेंढे यांनी जिल्ह्यातील धान पीक उत्पादन व शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्यांविषयी शास्त्रज्ञांना माहिती दिली. यावेळी कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बदललेल्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेल्या वाढीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकºयांनी धान पिकाला मिळत असलेला अल्प मोबदला कथन केला.

Web Title: Eri scientists interact with paddy growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी