शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करा

By admin | Updated: June 5, 2015 00:55 IST

आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे स्वप्न शासन व प्रशासन बघत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : आदिवासी विभागाने पुढाकार घेण्याची गरजभंडारा : आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे स्वप्न शासन व प्रशासन बघत आहे. त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी तहसिलदार व साजा तलाठी यांनी आदिवासी विद्यार्थी नांमाकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशित होईल या दृष्टीने ८ जूनपासून ग्रामसभा, द्वारभेट व इतर कार्यक्रमाद्वारे योजनेचे महत्व आदिवासी पालकांना समजावून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशित होतील याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाकरीता शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळामध्ये शिक्षण देण्याकरीता इयत्ता पहिली व पाचवी मध्ये प्रवेश देण्यास आदिवासी विकास विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्याकरीता २५ हजार विद्यार्थ्यांचा लक्षांक देण्यात आला आहे. त्यानुसार प्रती प्रकल्प १ हजार याप्रमाणे नागपूर विभागात एकूण ८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. ही योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून त्याद्वारे नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांस भोजन व निवासासह इंग्रजी माधमातून दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या शाळेतील प्रवेशाकरीता फक्त आदिवासी विद्यार्थी पात्र असून पालकाचे वार्षिक उत्पन्न १ लाख इतके असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्पोटित, निराधार, परित्यक्ता आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंब अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करुन प्रवेशित करण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रवेशाची मोहिम सुरु करणार आहे. आदिवासी विभागाचे अधिकाऱ्यांना तहसिलदारांनी सहकार्य करावे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ देता येईल याबाबत प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले आहेत. (नगर प्रतिनिधी)