शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर- तिरोडी रेल्वेमार्गावर विजेवरील गाड्या धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 05:00 IST

हावडा रेल्वे मार्गावर विजेवर गाड्या धावतात. तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान डिझेल इंजिनवर माल गाड्या व प्रवासी गाड्या धावतात. तत्पूर्वी कोळशावर चालणाऱ्या गाड्या या मार्गावर धावत होत्या. ४३ किलोमीटरच्या हा रेल्वे ट्रॅक असून ब्रिटिशांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. डोंगरी, चिखला व मध्यप्रदेशातील तिरोडी येथील मँगनीज खाणीतून मँगनीजच्या वाहतुकीकरिता हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. 

ठळक मुद्देविद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर : सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी होणार

मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ब्रिटिशकालीन तुमसर - तिरोडी या ४३ किलोमीटर रेल्वे मार्गावर लवकरच विजेवरील गाड्या धावणार आहेत. सध्या या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. कोरोना संक्रमण काळातही येथे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. तुमसर ते गोबरवाही पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. घनदाट जंगलातून हा रेल्वे मार्ग जातो. मध्यप्रदेशातील तिरोडीपर्यंत हा रेल्वे मार्ग जातो.मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर विजेवर गाड्या धावतात. तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान डिझेल इंजिनवर माल गाड्या व प्रवासी गाड्या धावतात. तत्पूर्वी कोळशावर चालणाऱ्या गाड्या या मार्गावर धावत होत्या. ४३ किलोमीटरच्या हा रेल्वे ट्रॅक असून ब्रिटिशांनी हा रेल्वे मार्ग तयार केला होता. डोंगरी, चिखला व मध्यप्रदेशातील तिरोडी येथील मँगनीज खाणीतून मँगनीजच्या वाहतुकीकरिता हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयाने तुमसर तिरोडी या रेल्वे ट्रॅकवर विजेवरील गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने  विद्युतीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.तुमसर तिरोडी या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा आयुक्त यांचेकडून तपासणी होणार आहे. पथकाचे अहवालानंतर या रेल्वेची पहिली चाचणी घेण्यात येईल. सुरक्षा आयुक्तांकडून मालवाहतूक व प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वे गाड्या या मार्गावर धावायला सुरुवात होईल. इलेक्ट्रिक विभागातील सुरक्षा पथकासह तज्ज्ञांचे पथक येथे सहभागी होणार आहेत. विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर उपकेंद्र, वीजवाहिन्या, विद्युत खांब येथे उभारण्यात आले आहेत. वाहिन्यांमधून वीज प्रवाह सोडण्याची प्रथम येथे चाचणी होणार आहे.सर्वप्रथम मालगाडी धावणार तुमसर तिरोडी रेल्वेमार्गावर सर्वप्रथम पहिली मालगाडी धावणार आहे. सुरक्षा आयुक्तांकडून हिरवी झेंडी मिळाल्यावर पहिली मालगाडी चालवण्यात येईल. त्यानंतर प्रवासी गाड्या येथे धावतील. मध्यप्रदेशाला जोडणारा हा एकमेव रेल्वे मार्ग असून तिरोडी कटंगी व जबलपूर रेल्वेमार्ग मध्य भारतात जाण्यासाठी कमी वेळेत  जाणारा ठरणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे