शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसात शिक्षकांचे वेतन काढणार

By admin | Updated: July 7, 2014 23:26 IST

तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनाची सांगता केली.

शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : प्राथमिक शिक्षकांच्या आंदोलनाची सांगता
भंडारा : तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर प्राथमिक शिक्षकांनी आंदोलनाची सांगता केली.
तालुक्यातील २३ प्राथमिक शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली आहे. प्रलंबित वेतन तातडीने अदा करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी शनिवारी प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले.
शालार्थ वेतन प्रणालीचे कारण दाखवून निवडक २३ शिक्षकांचे माहे एप्रिल २०१४ चे वेतन अदा करण्यात आले नव्हते.
खंडविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षक संघाने अनेकदा चर्चा केली. सदर शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येत नसल्यामुळे शिक्षकांच्या पाल्यांचे शिक्षण कौटुंबिक आरोग्य व आर्थिक यंत्रणा अडचणीत आली असून शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडली आहे. २३ शिक्षकांच्या प्रलंबित वेतन अदा न केल्यास प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा भंडाराच्या पंचायत समितीचे कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आंदोलनस्थळी शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देवून शिक्षकांचे वेतन विनाविलंब काढण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर आंदोलनाची रितसर सांगता करण्यात आली. आंदोलनात शिक्षक नेते दिलीप बावनकर, जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, तालुकाध्यक्ष दिलीप बागडे, सरचिटणीस प्रभू तिघरे, वामन ठवकर, रमेश मदारकर, नामदेव गभणे, अशोक भुरे, प्रमोद कळंबे, सुधीर वाघमारे, श्रावण हजारे, वीरेन्द्र निंबार्ते यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)