शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतूनच व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

लाखणी : इंग्रजी शिक्षणाला महत्त्व जरी दिले जात असले तरीही मातृभाषेतून शिक्षण पूर्ण करून स्वतःचे करिअर घडविणाऱ्याची संख्या ...

लाखणी : इंग्रजी शिक्षणाला महत्त्व जरी दिले जात असले तरीही मातृभाषेतून शिक्षण पूर्ण करून स्वतःचे करिअर घडविणाऱ्याची संख्या कुठेही कमी नाही. अनेक नोकऱ्यांमध्ये माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत घेऊन उच्च पदावरील नोकऱ्यांमध्ये असलेले असंख्य अधिकारी आपणास पाहता येतील.आपण स्वतः ग्रामीण भागात राहून दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून पूर्ण केले असल्याचे आणि या पदापर्यंत आलो असल्याचे विचार लाखनी येथील तहसीलदार मल्लिक विराणी यांनी सांगितले.

उच्च दर्जाचे आकलन होण्याकरिता मातृभाषा ही महत्त्वाची ठरते. वयोमानानुसार आकलनक्षमता वाढत जाते. आत्मविश्वासही वाढत जातो आणि मग उच्च माध्यमिक आणि पुढचे शिक्षण घेत असताना इंग्रजी सहज आत्मसात करता येते. आणि म्हणून मराठीमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना विद्यार्थ्यांच्या संयमाबरोबर पालकांचा सय्यमदेखील महत्त्वाचा ठरतो.

ही तयारी करत असताना धीर आणि आत्मविश्वास कुठेही कमी पडता कामा नये. असे विचार लाखणी लाखनी येथील तहसीलदार मल्लिक विराणी यांनी उज्ज्वल विद्यालय लाखोरी येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका कक्षाचे उद्घाटन पर भाषणात व्यक्त केले. यावेळी लाखणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज वाढिवे यांनीदेखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च दर्जाची समज व बुद्धिमत्ता आहे, मात्र माहितीचा अभाव मार्गदर्शनाअभावी हे विद्यार्थी मागे पडतात अभ्यासिका वर्गाच्या माध्यमातून यांना निश्चित मदत होईल रविकिरण वाचनालय व उज्ज्वल विद्यालय लाखोरी च्या या उपक्रमातून हे विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि निश्चितच आपले भविष्य घडवतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मंचावर उज्ज्वल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष गीता इलमे, कार्यवाह देवानंद चौधरी, रविकिरण वाचनालयाचे संस्थापक सुदाम वंजारी, कार्यवाह रवी सिंगनजुडे , पद्माकर सिंगनजुडे, सुमित्राबाई चौधरी, स्पर्धा परीक्षा कक्षाचे संयोजक अंगेश बेहलपाडे, सरपंचा अंजिराताई गणवीर, सुनील बांते, मारोती मेश्राम, विषतज्ज्ञ नरेश नखरे, ग्रा.पं.स. अनिलजी शेडे इ. मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती व पालकांची उपस्थिती लाभली होती. प्रास्ताविक अभ्यासिका कक्षाचे संयोजक अंगेश बेहलपाडे सूत्रसंचालन कल्पना सावरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश कंगाले, संजय खेडीकर, भीमराव मुटकुरे, अक्षय वाघाये ,भूपेश खेडीकर, शेखर कानतोडे, मयूर सिंगनजुडे, नीलेश भोयर, शिवम तितीरमारे, सतीश सार्वे, महेश उरकुडे, भानुदास चाचेरे, वर्षा मते, कुणाल कायते, सौरभ कायते आदींनी परिश्रम घेतले