दुर्गाबाई डोह तीर्थस्थळ घालतोय पर्यटकांनाही भुरळ

By Admin | Updated: July 14, 2014 00:27 IST2014-07-14T00:27:55+5:302014-07-14T00:27:55+5:30

विदर्भाची काशीप्रयाग म्हणून ओळखली जाणारी साकोली

Durgabai Doha attracts pilgrims | दुर्गाबाई डोह तीर्थस्थळ घालतोय पर्यटकांनाही भुरळ

दुर्गाबाई डोह तीर्थस्थळ घालतोय पर्यटकांनाही भुरळ

सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा : सोयी-सुविधा वाढविण्याची गरज
साकोली
: विदर्भाची काशीप्रयाग म्हणून ओळखली जाणारी साकोली तालुक्यातील कुंभली येथभील दुर्गाबाई डोह तीर्थस्थळ भाविकांना व पर्यटकांना भुरळ घालत असून येथे येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र ज्या प्रमाणे येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्याचप्रमाणे जर येथे सौंदर्यीकरण व सोयी-सुविधा करण्यात आल्या तर भाविकांची पुन्हा गर्दी वाढू शकते.
पुरातन काळापासून दुर्गाबाईची जत्रा प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी दुर्गाबाईची यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. चुलबंद नदीच्या तिरावर हे दुर्गाबाईचे मंदिर असून दरवर्षी मकरसंक्रातीला चार दिवस येथे भव्य अशी यात्रा भरते. या यात्रेत भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नव्हे तर अख्या विदर्भातून भाविक दर्शनाला येतात. अशा या प्रसिद्ध व पावनस्थळाचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे.
मंदिराला लागूनच निम्नचुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हे दुर्गाबाईचे मंदिर पुरातन काळापासून होते. दिवसेंदिवस हे मंदिर जीर्ण होत चालले होते. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कामाला प्रारंभ करण्यात आला. मंदिरातील दुर्गाबाईची जागृत मूर्ती जागेवरून न हलविता त्याच ठिकाणी भव्यदिव्य असे नवीन मंदिर शासननिधीतून तयार केले. त्यामुळे या मंदिराला आता नवीन लुक आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Durgabai Doha attracts pilgrims