शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग रेतीचा गोरखधंदा

By admin | Updated: July 2, 2014 23:12 IST

तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरुन नियमबाह्यपणे चार महिन्यांपासून रेती चोरीचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. नदीपात्रातून रेतीची उचल करुन गावाबाहेर ती डम्प केली जाते

तुमसर : तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) रेती घाटावरुन नियमबाह्यपणे चार महिन्यांपासून रेती चोरीचा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. नदीपात्रातून रेतीची उचल करुन गावाबाहेर ती डम्प केली जाते व त्यानंतर राजरोसपणे तिची डम्पवरुन उचल करणे सुरू आहे. येथे रेती माफियांचा रॅकेट सक्रिय असून महसूल प्रशासनाने त्यांच्यासमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.तामसवाडी या गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. विस्तीर्ण नदीघाट येथे आहे. नदीपात्रात मोठा रेतीसाठा उपलब्ध आहे. सुमारे चार ते पाच रेती कंत्राटदाराकडून रेतीची सर्रास उचल केली जात आहे. रेती नदीपात्रातून उपसा करुन सितेपार-डोंगरला रस्त्यावर गावाजवळ डम्प करण्याची शक्कल त्यांनी लढविली आहे. या डम्पवरुन राजरोसपणे ट्रक व ट्रॅक्टरमध्ये ती भरुन तिची वाहतूक सुरू आहे. हे ट्रक नागपूर येथे पाठविण्यात येतात. ट्रॅक्टर तुमसर शहरात रेतीची विक्री करीत आहेत. दररोज १० ते १५ ट्रक व ३५ ते ४० ट्रॅक्टर रेतीची येथून चोरी होत आहे. चार महिन्यांपासून हा गोरखधंदा सर्रास सुरू आहे. या रेतीचोरीला निश्चितच वजनदार व्यक्तीचे अभय असणार. या सत्रात शासनाने तुमसर तालुक्यातील आष्टी, देवनारा, लोभी व बपेरा या चार रेतीघाटांचेच लिलाव केले आहेत. तुमसर तालुक्यात नदी व मोठ्या नाल्यांच्या पात्रातून रेतीचा उपसा सुरू आहे. नदीपात्र व जिथे रेती डम्प केली जाते तिथे शासनाचे प्रतिनिधी पोलीस पाटील, तलाठी व मंडळ अधिकारी निश्चितच आहे, त्यांना या डम्पविषयी माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)