शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 30, 2016 00:18 IST

बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा सण म्हणजे पोळा.

शेतकरी संकटात : पोळा येऊनही रोवणीची कामे अपूर्णचमासळ : बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा सण म्हणजे पोळा. परंतु गेल्या पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी पडणारा दुष्काळ व यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने, पिकांची गंभीर अवस्था या व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या सणावर दुष्काळाचे सावट पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.मागील पाच ते सहा वर्षापासून दरवर्षी शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आला आहे. यावर्षी सुध्दा सुरुवातीच्या पावसाच्या विलंबनानंतर, रोवणी उशिरा झाली. बऱ्याच ठिकाणी अर्धवट झाली. तलाव, बोळ्या नाले, आतापासूनच कोरडे व्हायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांवर यावर्षी सुध्दा अस्मानी संकट कोसळण्याचे दाट चिन्हे दिसून येत आहेत. नागपंचमीपासूनच पावसाने दडी मारल्याने उर्वरित दिवसात काय होईल याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अपुरा पाऊस, पिकांची गंभीर अवस्था, भारनियमन या साऱ्या बाबींमुळे पिकांवर विपरीत परिणाम होवून उत्पादनात निश्चीतच घट होणार आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ यामुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. गावापासून तर शहरापर्यंत बाजारपेठा पोळा सणानिमित्त सजावटीच्या साजांनी सजलेल्या आहेत. बैलांना सजवण्याकरिता लागणारे साहित्याच्या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. शेतकऱ्यांकडे सजावटीच्या सामान खरेदीसाठी पैसा नाही, वर्षानुवर्षाच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी त्या दुकानाकडे पाठ फिरविली आहे. बाजारात उत्साह, चैतन्य नाही. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा होणारा पोळा सण यावर्षी मात्र काटकसरीने खर्च करुन साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे.पूर्वी जन्माष्टमीपासूनच शेतकरी आठवडी बाजारातून किंवा अन्य ठिकाणाहून बैलांच्या साजांचा सामान खरेदी करायचे. परंतु पिक पाणी बरोबर नसल्याने, दुष्काळी स्थितीची चाहुल लागल्याने शेतकऱ्यांनी हात आवरल्याचे दिसते. शेतकऱ्यांना आकर्षीत करण्यासाठी दुकानदारांनी, बैलांना सजवण्यासाठी लागणारी झुली, घुंगराच्या माळा, कवडीच्या माळा, बाशिंगे, कासरा खंड, कानोऱ्या गोंदे, भटाक्ष्या, बेगड, गेरु, विविध रंग, वेसणी, दावे, दोर मोहक इत्यादी विविध डिझाईनमध्ये आधुनिकतेचा वापर करुन विक्रीसाठी ठेवलेली आहेत. परंतु दुष्काळापायी दुकानदार, ग्राहक शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. दुष्काळी स्थिती व दिवसागणीक घटणारी, बैलजोडीची संख्या यामुळे सुध्दा दुकानदारांना अच्छे दिनची शक्यता कमी झाली आहे. भविष्यात बैलांचा साज विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागेल अशी प्रतिक्रीया दुकानदाराने व्यक्त केली. (वार्ताहर)असे आहेत दरसध्या मटाटा ४० ते ५० रूपये झुलीचा जोड ३५० ते ५५०, बेसण ३० ते ३५ रुपये, कासरा १००-२००, दावा ४०-५०, कानोरी १५ रुपये, शेरु १० रुपये, रंगडब्बी ५ रुपये अशा चढत्या भावात उपलब्ध आहेत. काही शेतकरी रंगाचे निव्वळ ढिपके मारुन बैलाना पोळ्यात नेऊन बैल सजवतात. इच्छा असतांना सुध्दा वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलाना तरुण राज्याच्या अवकृपेने व दुष्काळाने सजवतो घेत नाही व प्रम व्यक्त होत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.