शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोससाठी विलंब झाल्यास घाबरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

केशोरी : कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस जसजसे प्राप्त होतात तसतसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण ...

केशोरी : कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस जसजसे प्राप्त होतात तसतसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात लसीकरण मोहीम राबविणे सुरू आहे. लसीचा पहिला डोस मिळाला. दुसरा डोस केव्हा मिळणार म्हणून नागरिक विनाकारण आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालण्याचे प्रकार घडत आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी १२ आठवडे अंतराने लसीचा चांगला परिणाम दिसून येतो. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. विनाकारण लसीकरण केंद्रावर वाद घालू नका, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले आहे.

शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातदेखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती झाली असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविणे सुरू आहे. लसीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. पहिला डोस घेणारे दुसऱ्या डोससाठी विनाकारण आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. फेब्रुवारी, मार्चपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू केले आहे. जस-जसा लसीचा पुरवठा कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड प्राप्त होत आहे. तस-तसे लसीकरण सुरू केले जाते. प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे, ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. पहिला डोस घेणारे नागरिक लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी वाद घालत आहेत. कोणत्याही नागरिकांनी लसीकरण केंद्रावर वाद घालण्याची गरज नाही. लसीच्या डोस उपलब्धतेनुसार दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सतत सुरू राहील. दुसऱ्या डोससाठी विलंब झाल्यास नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. दोन डोसमधील अंतर जेवढे जास्त होईल तसा परिणाम चांगला दिसून येत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करून वाद घालू नये, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी कळविले.