शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला घाबरू नका, काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हात धुवा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देभुवनेश्वरी एस : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हात धुवून दिला स्वच्छतेचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना विषाणूला घाबरून न जाता त्याचे संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकांनी स्वच्छतेचा मार्ग आत्मसात करावा व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हात धुवा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी त्या बोलत होत्या.
हात धुवा प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) राजेश बागडे, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुरसुंगे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. शर्मा, शिक्षणाधिकारी आर. एस. काटोलकर, उपजिल्हा कार्यकारी समन्वयक अधिकारी खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
यावेळी भुवनेश्वरी एस. म्हणाल्या, जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे. या आजाराला घाबरून न जाता, सावधानता बाळगण्याची गरज आहे. विषाणू रूग्णाच्या संपर्कात आल्यास या आजाराची शक्यता उदभवू शकते. कोरोना विषाणू संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानी स्वत: उपाय योजना करून सावधानता बाळगावी. स्वच्छता पाळणे, नियमित हातधुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीतून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखून त्यावर मात करता येते. जिल्हा परिषदेमध्ये हातधूण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यामागचा उद्देश अधिकारी कर्मचाºयांच्या माध्यमातून स्वच्छता संदेश सर्वदूर पोहचविण्यासाठी आहे, असे सांगितले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने साबून अथवा हॅण्डवॉशद्वारे हात धुवून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखल्या जावू शकतो, याकरिता स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आवारात हातधूण्यासाठी विभाग प्रमुखांना पाचारण करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुखांनी हात धुवून स्वच्छतेचा संदेश सर्वदूर पोहचविण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेकरिता नियमित हात धुवावे व आजाराचा प्रादूर्भाव रोखावी असे आवाहन केले. हातधुण्यासाठी जिल्हा कक्षाचे वतीने हॅण्डवॉश, सॅनिटायझर व नॅपकीनची व्यवस्था करण्यात आलेली होती.

जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती सुरू केली आहे. यासाठी फलेक्सच्या माध्यमातून खबरदारी घेण्याचे आवाहन करून उपाय योजना सांगितले आहेत.
कोरोना विषाणूला घाबरू नका, सावध रहा, लक्षणे दिसल्यास उपचार घ्या असे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाची खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडळला निर्माण होणे आदी लक्षणे सांगून या विषाणूचा संक्रमण रोखण्यासाठी उपाय सांगितले आहेत. बाहेर देशातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांमध्ये जर लक्षणे आढळली तर त्वरित कॉल सेंटर अथवा आपल्या जवळील शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा. बाधित रूग्णांनी (प्रवासी) मास्कचा वापर करावा, इतर लोकांपासून दूर राहावे, घराबाहेर अधिक काळ वावरू नये, स्वत: उपचार करू नये, डॉक्टराच्या सल्लानुसार उपचार करावा. शिंकताना खोकताना रूमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करावा अशा प्रकारे काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तीच्या विलगीकरणाची व्यवस्था जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हातधुवा कार्यक्रमाकरिता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस