कर्जबाजारी होऊन देववारी करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:20+5:30

भंडारा तालुक्यातील परसोडी येथील मराठा योध्दा गु्रपद्वारे सार्वजनिक शिवजयंती सोहळानिमित्त आयोजित समाजप्रबोधनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोजराज वैरागडे, सोनी खन्ना, ओमप्रकाश गेडाम, दर्शन फंदे, अ‍ॅड. किशोर लांजेवार, सरपंच कल्पना मोटघरे, बालु ठवकर, उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार, रंजीत सिंग आदी उपस्थित होते.

Do not be a debt-ridden goddess | कर्जबाजारी होऊन देववारी करु नका

कर्जबाजारी होऊन देववारी करु नका

Next
ठळक मुद्देसत्यपाल महाराज : परसोडी येथील सार्वजनिक शिवजयंती सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : देव देवात नसून माणसात देव पहा. मुलांना उत्तम शिक्षण द्या, बुवा-भटजी- महाराजाच्या नादी संसार विस्कळीत करु नका. देवाची आरतीपेक्षा मुलांचा रोज अभ्यास करवून घ्या. महाराजाच्या पाया पडण्यापेक्षा आई-वडीलांची सेवा करा, परिणामी देव प्राप्तीसाठी कर्जबाजारी होऊन देववारी करु नका, असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
भंडारा तालुक्यातील परसोडी येथील मराठा योध्दा गु्रपद्वारे सार्वजनिक शिवजयंती सोहळानिमित्त आयोजित समाजप्रबोधनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भोजराज वैरागडे, सोनी खन्ना, ओमप्रकाश गेडाम, दर्शन फंदे, अ‍ॅड. किशोर लांजेवार, सरपंच कल्पना मोटघरे, बालु ठवकर, उपसरपंच ज्ञानेश्वर हटवार, रंजीत सिंग आदी उपस्थित होते.
मनोरंजनातून समाजप्रबोधन लहान मुलांना प्रश्न विचारीत सत्यपाल महाराजद्वारे पुस्तक भेट देण्यात येत होते. तसेच वयोवृध्द मातांना सैनिकांच्या मातेला साडी-लुगडी, शाल देऊन सत्यपाल महाराज, दान करीत होते.
कीर्तनात सत्यपाल महाराज म्हणाले, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रथम तरुण मुलांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत जागृती होणे गरजेचे, दारु सेवनाने सुखी संसाराची राखरांगोळी होते. महानत्यागी बाबा जुमदेव यांचे विचार आत्मसात करा. फुले- शाहू आंबेडकर यांच्या शिक्षण विषयक विचार मुलांमध्ये रुजवा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतर धर्मीयाप्रंती अर्थात मुस्लीम महिला विषयी आदरभावप्रमाणे जातीय सलोखा गावागावात निर्माण करा, महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विषयी सावित्री भीमाई, रमाई, जिजाऊ यांचे विचाराची आज गरज आहे.
तत्पूर्वी सकाळी ग्राम स्वच्छता राबवण्यिात आले. शिवजयंतीनिमित्त गावातुन शोभायात्रा काढण्यात आली. संचालन घनश्याम वंजारी यांनी केले. आभार मोरेश्वर समरीत यांनी मानले. कार्यक्रमासाठी हरिश हटवार, किशोर बावनकुळे, मंथन हटवार, राहुल येळणे, कमलेश चकोले, अतुल चोपकर, कुंदन कुंडले, बादल साठवणे, अनमोल गुरनुले यांनी सहकार्य केले.

Web Title: Do not be a debt-ridden goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.