दिव्या बनली त्या गावातील मुलांची सावित्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:25+5:30

ही आधुनिक सावित्री आहे मोहाडी तालुक्यातील नरसिंहटोला या खेड्यातील. तिचं नाव आहे दिव्या अय्यर, बी.कॉम.पर्यंत शिकलेली व संगणकाचे ज्ञान असलेली गरीब मुलगी आहे. तिची आई स्वर्गीय पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला या शाळेत आहार शिजवायला जायची. या मुलीला गावातील वास्तव परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे कोविड-१९ ने शिक्षणात अनेक अडथळे निर्माण केले आहेत.

Divya became the Savitri of the children of the village | दिव्या बनली त्या गावातील मुलांची सावित्री

दिव्या बनली त्या गावातील मुलांची सावित्री

Next
ठळक मुद्देदोन तास अध्यापन : संधीच केलं सोन, कोरोना संकटकाळात मिळाला आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. पण खेड्यातील मुलांपर्यत ऑनलाईन शिक्षण पोहचतच नाही. तथापि, नरसिंहटोला येथील एक शिक्षित तरुण मुलगी सावित्री बनली. तिने गावातील मुला- मुलींना आर्थिक लाभाची आस न करता अध्यापन सुरू केले आहे.
ही आधुनिक सावित्री आहे मोहाडी तालुक्यातील नरसिंहटोला या खेड्यातील. तिचं नाव आहे दिव्या अय्यर, बी.कॉम.पर्यंत शिकलेली व संगणकाचे ज्ञान असलेली गरीब मुलगी आहे. तिची आई स्वर्गीय पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला या शाळेत आहार शिजवायला जायची.
या मुलीला गावातील वास्तव परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे कोविड-१९ ने शिक्षणात अनेक अडथळे निर्माण केले आहेत. नवीन शैक्षणिक सत्राला शाळा कधी सुरू होईल याबाबत कोणीही सांगूच शकत नाही. शाळा बंद पण शिक्षण सुरू हा शिक्षण विभागाचा उपक्रम सुरू आहे. पण, पालकांकडे स्मार्ट फोन नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून खेड्यातील अनेक मुलं, मुली वंचित आहेत.
गावातील मुलं रिकामी फिरतात. मनसोक्त खेळतात. पण, अभ्यासापासून ही मुलं खूप लांब जात असल्याचे दिव्या बघत होती. पण, या धाकधूकीच्या वातावरणात ती संधी शोधत होती. चार दिवसांपूर्वी गट साधन समूह पंचायत समितीकडून विना मानधनावर मुलांना अध्यापन करणाऱ्या स्वयंसेवकांनी लिंक भरायची होती. मुख्याध्यापिका सुनीता तोडकर यांनी त्या दिव्या सोबत संपर्क केला. सगळी वास्तविक माहिती दिली.
अलीकडे शिकवण्या व्यवसाय असताना मोफत शिकवायच म्हटलं तर नाक मुरड नारी अनेक भेटतील. पण ती म्हणाली, ताई, मी माझ्या गावातील मुलांना शिकवायला तयार आहे. मला काही नको. ती दिव्या विना मानधन शिक्षण द्यायला प्रेरित झाली. लगेच तिने दुसऱ्या दिवशीपासून पहिली ते सातवीच्या मुलांमुलींना चार दिवसापासून शिकवीत आहे. आता गावात फिरणारी मुलं दिव्याच्या घरी पुस्तक वह्या घेवून येत आहेत. या मुलांसाठी सावित्री बनलेली दिव्या अनेकांची प्रेरणास्थान बनली आहे.

Web Title: Divya became the Savitri of the children of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.