जिल्ह्यात आज चार व्यक्ती कोरोनामुक्त होऊन परतल्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:01:02+5:30

भंडारा जिल्हा सुरुवातीला महिनाभर कोरोनामुक्त होता. मात्र गराडा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पाहता पाहता रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली. त्यातही मुंबई-पुणे आदी महानगरातून आलेले व्यक्तीच कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले. जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी पोहचले आहेत.

In the district today, four persons returned home after being released from the corona | जिल्ह्यात आज चार व्यक्ती कोरोनामुक्त होऊन परतल्या घरी

जिल्ह्यात आज चार व्यक्ती कोरोनामुक्त होऊन परतल्या घरी

Next
ठळक मुद्देआज एकही नवीन रुग्णाची नोंद नाही। आतापर्यंत १८ जण झाले कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ४१ वर पोहचली असून आज चार व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. आतापर्यंत १८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून सध्या २३ क्रियाशिल कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आज एकाही नवीन रुग्णांची भर पडली नाही. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
भंडारा जिल्हा सुरुवातीला महिनाभर कोरोनामुक्त होता. मात्र गराडा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली आणि जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. पाहता पाहता रुग्णांची संख्या ४१ वर पोहचली. त्यातही मुंबई-पुणे आदी महानगरातून आलेले व्यक्तीच कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले. जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी पोहचले आहेत. जिल्ह्यातील २३०५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २१४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १२४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. ६ जून रोजी आयसोलेशन वॉर्डामध्ये २६ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३४८ व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली. कोवीड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे ३८५ व्यक्ती दाखल असून १५९८ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे. मुंबई-पुणे व महानगरातून जिल्ह्यात ४० हजार ५०१ व्यक्ती दाखल झाले असून त्यापैकी २८ हजार ९२९ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. अन्य ठिकाणाहून आलेल्या ११ हजार ५७२ व्यक्ती सध्या होम क्वारंटाईन आहेत.

जिल्ह्यात साकोली तालुक्यात सर्वाधिक १९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल लाखांदूर तालुक्यात ११, भंडारा तालुक्यात ५, पवनी ३ आणि तुमसर, मोहाडी आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करून प्रादूर्भाव रोखण्याचे प्रयत्न करीत आहेत.

Web Title: In the district today, four persons returned home after being released from the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.