शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षा नाकारावी

By admin | Updated: September 1, 2015 00:26 IST

जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेचा जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखाला ‘युजलेस’ म्हणने चुकीचे आहे.

नरेंद्र भोंडेकर गरजले : लोकप्रतिनिधींनाही मिळते अपमानास्पद वागणूक भंडारा : जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेचा जबाबदारी ज्या पोलीस प्रशासनावर आहे, त्या पोलीस प्रशासनाच्या प्रमुखाला ‘युजलेस’ म्हणने चुकीचे आहे. गृह विभाग युजलेस असेल तर त्यांचे पोलीसही युजलेस आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस सुरक्षाही घेऊ नये. अशा जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्ह्यातून हटविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.यावेळी भोंडेकर म्हणाले, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत असताना एकाही शेतकऱ्यांच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. पवनी येथे तहसील कार्यालयात झालेल्या घटनेनंतर जिल्हाधिकारी त्यांचे नेतृत्व करतात, ते जनतेची कामे करण्यासाठी आले की कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी आले असा प्रश्न निर्माण झाला आहे.महिना भरापूर्वी शहरात प्रीती पटेल या महिलेचा खून व अश्विनी शिंदे या तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधींनाही अपमानास्पद वागणूक दिली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कोणत्याही शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांना भेटावयाचे असेल तर पाच-सहा लोकांना परवानगी देण्यात येते. आणि स्वत: २५ लोकांना घेऊन पोलीस अधीक्षकांकडे जातात आणि त्यांच्याच कक्षात जावून त्यांना अपमानास्पद शब्दात बोलतात, आयपीएस नाही म्हणतात, असे बोलणे हे प्रमुख अधिकाऱ्यांना उचित ठरणारे नाही. जिल्ह्यातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसेल तर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सुटणार कसे? या दोघांच्या वादामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले. तीन दिवसाच्या लेखणी बंद आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला बसला. जिल्ह्यात दोन प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये अतिशय खालच्या स्तरावरचे भांडण सुरू असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कुठे गेले आणि गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना ‘युजलेस’, तुम्ही ‘आयपीएस’ नाही असे म्हणून मनोबल खच्ची करीत असेल तर शिवसेना त्याचे कदापि समर्थन करणार नाही. अशा जिल्हाधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, यशवंत सोनकुसरे, अनिल गायधने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)