राष्ट्रवादीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:01 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:01:09+5:30

तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात आले. व्यापार उद्योगधंदे बंद आहेत. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मदतीला धावून आली.तालुक्यातील नागरीक उपाशी राहू नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे.

Distribution of essential commodities by NCP | राष्ट्रवादीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राष्ट्रवादीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ठळक मुद्देसाकोली तालुक्यात वितरण, लॉकडाऊनने संकटात असलेल्यांना दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : देशभरात कोरोना विषाणूचे थैमान घातले असून शासनाचे लॉकडाऊन आदेश जारी केला आहे. यामुळे शेतमजुरी करणाऱ्या गोरगरीबावर संकट निर्माण झाले आहे. अशा संकटाच्या काळात माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण केले जात आहे.
तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात आले. व्यापार उद्योगधंदे बंद आहेत. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मदतीला धावून आली.तालुक्यातील नागरीक उपाशी राहू नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. यावेळी माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, उमेश् भेंडारकर, सुरेश बघेल, यशपाल कऱ्हाडे, सोनू बैरागी, मुशीर खान, इमरान पठाण, अनुप अतकरी, प्रणय शहारे, कुणाल क्षीरसागर, भूपेश तरोणे आदी उपस्थित होते.

प्रफुल पटेल यांचा पुढाकार
कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिक संकटात सापडले असून अशा नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल धावून आले आहे. त्यांच्या सूचनेवरुनच भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्यावतीने मदतीचे वितरण केले जात आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. शासकीय नियमाचे उल्लंघन करु नये, असे आवाहन खासदार पटेल यांनी केले आहे.

मदतीचा हात
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाभरात गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांपर्यत ही मदत पोहोचवली जात असून त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. साकोली तालुक्यासोबत लाखनी, लाखांदूर तालुक्यात मदतीचा हात दिला जात आहे.

Web Title: Distribution of essential commodities by NCP