शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वलनी गावावर कोसळले विसर्जनाचे विघ्न

By admin | Updated: September 28, 2015 00:52 IST

शाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली.

अशोक पारधी  पवनीशाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली. मात्र, नियतीला त्यांची आराधना मान्य नव्हती. विसजर्नाच्या दिवशीच दोन चिमुकल्या बालकांवर काळाने झडप घातली. याप्रसंगामुळे वलनी येथील नागरिकांवर शोककळा पसरली आहे. तालुक्यातील वलनी (चौ.) येथील गांधी विद्यालयात शिकणारे दोन शालेय विद्याथी समीर मनोज जनबंधू (१४) गौरव संदीप मेश्राम (१२) असे मृतक बालकांचे नाव आहेत. गणपती विसर्जनासाठी वलनी घाटावर बालमित्र गेले असता बुडून दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती होताच गावातील आबालवृध्दांनी नदी घाटाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. या घटनेमुळे जनबंधू व मेश्राम कुटुंबावर मोठा आघात झाला. दोन्ही चिमुकल्यांची आईवडील पार शोकसागरात बुडाली होती. त्यांनी फोडलेल्या टाहोमुळे उपस्थितांची मने हेलावली. त्यांना सावरताना सर्वांची हृदय दाटून आल्याने डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समीर आठवीत तर गौरव पाचव्या वर्गाचा विद्यार्थी होता. दुरुन वाहत येणारा गणपती समिरच्या पायाला लागला. त्याला ढकलण्यासाठी तो माघारी फिरला. तो गणपतीसोबत वाहून जाताना पाहून गौरवनेही त्याचेकडे धाव घेतली व समीर व गौरव दोघेही वाहत जाताना सोबत असलेल्या मुलांनी पाहिले. त्यांनी गावात येवून लोकांना सांगितले. ग्रामस्थ व मुलांच्या घरच्यांनी नदीघाटाकडे धाव घेऊन शोधाशोध केली. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी धरमशी, पोलीस निरीक्षक मधुकर गिते, बीट जमादार गोंडाणे व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दिवसभर पवनी व कोदुर्ली गावातील ढिवर समाजाचे गोताखोर नदीमध्ये खूप दूरपर्यंत शोध घेत होते. वलनी (चौ.) गावावर हा फार मोठा आघात असल्याने गावात शोककळा पसरली आहे.