शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

निर्जंतुकीकरणाचा खर्च आपत्ती व्यवस्थापनाने करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता निर्जंतुकीकरणाचा भार कुणी उचलायचा असा संभ्रम आहे. तालुक्यातील एका गावच्या शाळेचा वापर करण्यात आला होता.

ठळक मुद्देशाळा सुरू होणार की नाही संभ्रमावस्था : विषयाने पालकही चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शाळा सुरू होणार असे तुणतुणे वाजवले जात आहेत. शाळा सुरू होण्याची संभाव्य वेळ जवळ येऊन ठेपली आहे. शाळा निर्जंतुकीकरण करण्याचे सांगितले जात आहे. मात्र या शाळा निर्जंतुकीकरण कोणत्या खर्चाने व कुणी करायच्या याबद्दल स्पष्टता नाही. या खर्चाचा भार आपत्ती व्यवस्थापनाने करून तातडीने निर्जंतुकीकरण करावे अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या अलगिकरणासाठी शाळा, महाविद्यालयात प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. अद्याप काही शाळा महाविद्यालयात अलगिकरण, विलगिकरण करून ठेवलेली लोकं आहेत. तर अनेक शाळा रिकाम्या झाल्या आहेत. आता निर्जंतुकीकरणाचा भार कुणी उचलायचा असा संभ्रम आहे. तालुक्यातील एका गावच्या शाळेचा वापर करण्यात आला होता. आता निर्जंतुकीकरणाचा प्रश्न आहे. शालेय व्यवस्थापनाने ग्रामपंचायतकडे विचारणा केली. त्यांनी निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या रसायनाचा पुरवठा करण्याची हमी दिली. मात्र यासाठी लागणारा मनुष्यबळ व यंत्राची जबाबदारी शाळेवरच घातली.
शाळा हा खर्च कुठून करणार हा प्रश्न आहे. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनाबद्दल सुरुवातीपासूनच अनिभज्ञता आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना अनेक विभागात हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यासाठी आलेला निधी जिरविण्यात आला. शहरात व काही ग्रामीण भागात तर ब्लिचिंगची फवारणी केल्याचे प्रकार घडलेत. याकडे कुणीही लक्ष घातले नाही. त्यामुळे फवारणीसाठी आवश्यक असलेले रसायन व फवारणीचे साहित्य प्रशासनाने पुरविले पाहिजे.

शाळा निर्जंतुकीकरण करा
बाहेरून आलेल्या लोकांच्या विलगीकरणासाठी शासकीय, खासगी शाळा, महाविद्यालयांचा वापर करण्यात आला.शाळा, महाविद्यालये ही कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकतात असे प्रशासनाच्या वक्तव्यांवरून दिसून येते.अशा वेळेपूर्वी निर्जंतुकीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनाकाडे कोरोनावर मात करण्यासाठी मोठा निधी असतो. या निधीतून प्रशासनाने वापरलेल्या शासकीय व खासगी इमारतीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याचे मत जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Schoolशाळा