शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुम खननाने तलावाचे विद्रुपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

मेंगापूर शिवारात असलेल्या तलावात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मुरुम व मातीची उचल करीत असल्याची तक्रार मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींनी दिली होती. खोदकाम केल्याने तलावाचा परिसर अतिशय विद्रूप झाला असून नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाले आहे. सदर कार्य करणाऱ्यांना कशाचीच भीती उरली नसल्याचेही यावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्देमेंगापूर येथील प्रकार : महसूल विभागाचे दुर्लक्ष, पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखनी तालुक्यातील मेंगापूर येथे असलेल्या गट क्रमांक ११ मधील तलावातील मुरुमाच्या मोठ्या प्रमाणात उपशामुळे तलावाचे विद्रूपीकरण झाले आहे. विशेष म्हणजे सदर प्रकार दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही यावर प्रशासनाकडून कुठलीच कारवाई झालेली नाही.मेंगापूर शिवारात असलेल्या तलावात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मुरुम व मातीची उचल करीत असल्याची तक्रार मंडळ अधिकारी यांच्यासह तहसीलदारांना २४ एप्रिल रोजी पर्यावरण प्रेमींनी दिली होती. खोदकाम केल्याने तलावाचा परिसर अतिशय विद्रूप झाला असून नैसर्गिक सौंदर्य नष्ट झाले आहे. सदर कार्य करणाऱ्यांना कशाचीच भीती उरली नसल्याचेही यावरून दिसून येत आहे. परिणामी याबाबत पर्यावरण प्रेमींनीही नाराजगी व्यक्त केली आहे. तलावातून मुरुम उपसा केल्यानंतर त्याची वाहतूक करण्याकरिता रस्ता बनविण्यात आला आहे. मनमर्जीने उत्खनन सुरु असून परवानगीपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याचीही ओरड ग्रामस्थांमध्ये आहे. याप्रकारामुळे प्रशासनाचा लक्षावधी रुपयाचा महसूलही बुडत असल्याचे सांगण्यात येते.लाखोंचा महसूल पाण्यातपरवानगीपेक्षा जास्त मुरुमाचे खनन होत असल्याने मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत आहे. महसूल प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.