शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमक विषाणूंमुळे वाढताहेत आजार

By admin | Updated: October 20, 2014 23:07 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे.

भंडारा : बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. यात आजारांचादेखील समावेश आहे. सर्वांत जास्त आजार हे संक्रामक विषाणूंमुळे होत असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. भारतात सर्वाधिक मृत्यू विषाणुंच्या संक्रमणाने होत असल्याचे दिसते. डास, पाणी, अन्नातूनही प्रसारभारतात होणाऱ्या संक्रामक आजारांमध्ये ९0 टक्के लोकांना अँन्टीबायोटिक्सची गरज नसते. मात्र, गोळ्या घेतल्याशिवाय बरे वाटत नसल्याची मानसिकता निर्माण झाल्याने आपण जबरदस्तीने औषधांचे सेवन करीत राहतो. आजारी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे होणाऱ्या संक्रमणाच्या या क्रियेत अनेकदा सूक्ष्म जीवांचा प्रसार जलदगतीने आणि थेट होतो. कधी-कधी थेट संक्रमण न होता डास, पाणी, अन्न यामाध्यमातूनही प्रसार होतो. याचा वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. जिवाणूंचे संक्रमण झाल्याचे लक्षात येताच डॉक्टारांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. औषधांचा अयोग्य वापरशारीरिक किंवा मानसिक आजार दूर करण्यासाठी किंवा शारीरिक वेदना घालविण्यासाठी सवर्सामान्यपणे औषधांचा वापर केला जातो. औषधांमुळे जसा रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे अनेक नवीन आजार उदभवण्याची किंवा मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक औषधेसंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी दोन प्रकारची औषधे वापरतात. लस किंवा प्रतिसिरम यापैकी काही औषधे, खासकरुन पोलिओची लस, अन्य प्रभावी औषधी नसल्यामुळे मौल्यवान मानली जातात. लसींमध्ये विशिष्ट रोग निर्माण करणारे जिवाणू अर्धवट किंवा मृतावस्थेत असतात. लसीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या लसीमुळे, विशिष्ट रोगाचा सामना करणारी प्रतिपिंडे निर्माण होतात. अशाप्रकारे लस एखाद्या रोगाचा संसर्ग झाल्यास प्रतिकार करण्यासाठी शरीराला प्रतिक्षम बनवते. पटकी, घटसर्प, यकृत, शोथ (कावीळ), गोवर, देवी या रोगांवर लस आता उपलब्ध असून लसीकरणामुळे देवीच्या रोगाचे निर्मूलन शक्य झाले आहे. मधुमेहासारखे विकारसंक्रमण झालेल्या व्यक्तीची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असण्याची शक्यता असते. काही औषधीच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती घटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय पोषणाची स्थिती, मधुमेहासारखे विकार यांसारखे अनेक घटक रोगनिमिर्तीवर बरेवाईट प्रभाव पाडू शकतात. प्रभावी औषधोपचार घेत आहे अथवा नाही आणि इतरांना संसर्ग टाळावा म्हणून आपल्या परीने किती काळजी घेत आहे यांवरही संसर्गातून पसरणाऱ्या जीवांचे प्रमाण अवलंबून असते. (प्रतिनिधी)