शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना मिळाले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

सडक अर्जुनी : तालुक्यातील डव्वा येथील महाराष्ट्र बँकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे १० ते १२ अपंग लोकांचे मानधन अडले होते. पळसगाव ...

सडक अर्जुनी : तालुक्यातील डव्वा येथील महाराष्ट्र बँकेच्या अडेलतट्टू धोरणामुळे १० ते १२ अपंग लोकांचे मानधन अडले होते. पळसगाव येथील माजी सरपंच उदयकुमार कावळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे अपंगांना मानधन मिळाले आहे.

अपंगत्व प्राप्त लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य अनुदान शासनातर्फे प्रदान करण्यात येते. डव्वा परिसरातील अपंग व्यक्तीचे अर्थसहाय्य महाराष्ट्र बँक शाखा डव्वा येथून प्राप्त होते. परंतु महाराष्ट्र बँकेने लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी पालकत्व प्रमाणपत्राची अट घालून ते सादर केल्याशिवाय लाभार्थ्यांना खातेही उघडता येणार नाही व अनुदानही प्राप्त होणार नाही, अशी अट ठेवली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र न्यायालयातून आणणे कठीण असल्यामुळे ती अट सध्या तरी शिथिल करावी व अत्यंत गरजू असलेल्या अपंग लाभार्थ्यांना त्यांचे अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी विनंती पळसगाव (डव्वा) येथील उदयकुमार कावळे यांनी महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना केली. त्याची प्रत जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया व तहसीलदार सडक अर्जुनी यांना देण्यात आली. यानंतर शाखा व्यवस्थापक मानत नसल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर अपंगांना आपल्या हक्काचे अर्थसहाय्य प्राप्त झाले.