शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डिंपलची आत्महत्या नसून हत्याच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:05 IST

आंतरराज्यीय विवाह करून संसार करीत असताना अचानक काल एका १९ वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरी गळफास लावतांना दिसला. मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच आहे.

ठळक मुद्देआरोपींना फाशीची शिक्षा द्या : मुलीच्या वडिलाची पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आंतरराज्यीय विवाह करून संसार करीत असताना अचानक काल एका १९ वर्षीय महिलेचा मृतदेह राहत्या घरी गळफास लावतांना दिसला. मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच आहे. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी साकोली पोलीस स्टेशन येथे दिली आहे. डिंपल मुन्ना कोसरे (१९) रा.जांभळी खांबा असे मृतक महिलेचे नाव आहे.डिंपल व मुन्ना यांचे २०१६ ला आंतरजातीय विवाह केला होता. लग्नानंतर डिंपल पती मुलाच्या घरीच राहत होती. दोघांनाही दिड वर्षाचा मुलगा आहे. नेहमीप्रमाणे मुन्ना कामाला गेला होता व दुपारी घरी आला व शेतातून येतो म्हणून सांगून गेला. सायंकाळी घरी परत आल्यानंतर घराचे दार आतमधून बंद होते. खिडकीतून पाहिले असता डिंपल सिलींग फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसली. त्यामुळे मुन्ना ते दार तोडून डिंपलला खाली उतरविले. मात्र तोपर्यंत डिंपलचा मृत्यू झाला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी डिंपलचे प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आणले अशी माहिती पोलिसांना दिली.मृत डिंपलचे वडील लाला जयराम बोंबर्डे रा.वडेगाव यांनी पोलिसात तक्रार दिली की, ‘मुन्ना कोसरे, उमराव कोसरे, सुशीला कोसरे, भोजराम कोसरे व सविता बावणे हे डिंपलला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास बाध्य केले’. लग्नानंतर मुलीच्या सारकडचे लोक मुलगी अनुसूचित जातीची असल्यामुळे वारंवार जातीवाचक शिवीगाळ करीत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळून माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.शवविच्छेदनानंतर डिंपलचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी जांभळी येथे नेण्यात आले. पोलिसांनी मृत डिंपलचे पती मुन्ना कोसरे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भादंविच्या ४९८, ३०६ (३४), ३,२,५ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून तपास प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी करीत आहेत.मातृत्व हरपलेडिंपल व मुन्ना यांच्या वैवाहिक जीवनाला दोन वर्षे झाली. संसार सुरळीत सुरु होता. त्यानंतर या वैवाहिक जीवनात त्यांना एक मुलगा झाला. पार्थव असे या चिमुकल्याचे नाव आहे. आईच्या अकाली मृत्यूमुळे पार्थव वरील आईचे मातृत्वच हरपले आहे.रिपब्लिकन सेनेचे निवेदनडिंपलच्या मृत्यूची योग्य ती चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन रिपब्लीकन सेनेतर्फे पोलीस स्टेशन येथे कल्याण मेश्राम, विक्की राऊत, देवानंद इलमकर, आशीर्वाद वैद्ये, रुपेश तागडे, शामकुवर रंगारी, भावेश कोटांगले यांनी दिले आहे.

टॅग्स :Murderखून