शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांची स्काॅर्पिओ कार खड्ड्यातून उसळून उलटली; एक ठार, नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

आठ दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील साखरी येथील दहाजण स्कार्पिओने देवदर्शनासाठी गेले होते. शेगाव, शिर्डीमार्गे जयपूर, जोधपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना  मोहघाटा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यातून स्कार्पिओ उसळून  उलटली. चारही चाके वर झाल्याने अपघातात घाशीराम जागीच ठार झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आलेली.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे एका प्राध्यापकाचा बळी घेण्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा खड्ड्यांनी एका भाविकाचा बळी घेताला. खड्ड्यातून स्कार्पिओ उसळून उलटल्याने झालेल्या अपघातात छत्तीसगड राज्यातील एक भाविक ठार, तर नऊजण जखमी झाले. हा अपघात साकोली तालुक्यातील मोहघाटा येथे मंगळवारी सकाळी ५.३० वाजता घडला. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.घाशीराम धनेश साहू (६०) रा. साखरी (छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे.  कमलेश ताम्रकार (४८), गुलाब ताम्रकार (६६), बदरून नेताम (६५), नारायण श्रीवास (६५), भरोसा सिन्हा (५८),  कन्हैया हुबेकर (६६), छबिलाल शाहू (६०) आणि चालक राजू ताम्रकार (४०) अशी जखमींची नावे आहेत. आठ दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील साखरी येथील दहाजण स्कार्पिओने देवदर्शनासाठी गेले होते. शेगाव, शिर्डीमार्गे जयपूर, जोधपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना  मोहघाटा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यातून स्कार्पिओ उसळून  उलटली. चारही चाके वर झाल्याने अपघातात घाशीराम जागीच ठार झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आलेली. ठाणेदार जितेंद्र बोरकर पथकासह घटनास्थळी पोहोचले.  जखमींना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणले.  त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

आठवडाभरात दुसरा बळी- साकोली येथे दुचाकीने परत येत असताना प्रा. प्रोफेसर बहेकार यांचा भीषण अपघात झाला होता. एका खड्ड्यातून त्यांची दुचाकी उसळल्याने ते खाली काेसळले आणि त्याचवेळी त्यांच्या अंगावरून ट्रक गेला. ट्रकखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मंगळवारी पुन्हा खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एका भाविकाचा मृत्यू झाला. प्राध्यापकाच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही. आठवडा लोटला तरी महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही.

 

टॅग्स :Accidentअपघात