शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभापासून वंचित

By admin | Updated: June 13, 2015 00:40 IST

अपंग व्यक्तींना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही ...

व्यथा अपंग लाभार्थ्यांची : सूचनेचाही अभाव तुमसर : अपंग व्यक्तींना इंदिरा आवास योजनेतून घरकुलाचा लाभ देण्यात यावा असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांनाही आदेशाला बगल देत अपंगाना घरकूल योजनेचा लाभ देण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे.दारिद्रय रेषेखालील नागरिकांना हक्काचे घरकूल देणाऱ्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत मानसिक व शारिरीक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीला घरकूल देण्यासंदर्भात केदं्र शासनाचे स्पष्ट दिशानिर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र अपंगाना इंदिरा आवास योजनेत डावलल्या गेल्याचे धक्कादायक वास्तव सामोर आले आहे. याबाबद आता राज्य शासनाने नविन आदेश काढून इंदिरा आवास योजनेअंतर्गत वंचित अपंगाची प्रतिक्षा यादी तयार करुन त्यांना घरकूल देण्याची मागणी येथील अंपग बांधवांनी केली आहे. इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून अपंगाना घरकूल लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने काही दिशा निर्देश दिले आहेत. यात अपंग शारीरिक किंवा मानसिक हा कमित कमी चाळीस टक्यापेक्षा कमी नसावा असा अपंगाना प्राधान्य देण्याच्या सुचना केंद्रशासनाच्या आहेत. मात्र याबाबत राज्य शासन व प्रशासन गंभिर नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र अपंग लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत नाही. केंद्र शासनाने सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी जे दिशा निर्देश दिले आहेत. त्यामध्ये विधवा, परिपक्त्या तथा कठिण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या महिला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असणारे मानसिक, शारीरिक अपंग तसेच सशस्त्र कारवाईत जीव गमाविलेल्या सैनिक व पोलिसांना इंदिरा आवास योजनेत घरकुल देताना प्राधान्य देण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्हयात व तालुक्यात अपंग व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगाना घरकुल देण्याबाबतची सुचना देण्यात आली नाही. त्यामुळे केंद्राचे आदेश असतांनाही अधिकाऱ्याचा अज्ञानामुळे व हलगर्जीपणामुळे अपंगाना घरकुलपासून वंचित राहावे लागत आहे या महागाईच्या काळात चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगाना घरकुल बांधणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. बऱ्याच प्रमाणात अपंगांना निवारा नसल्याने उघड्यावरच जिवन जगत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र राज्य शासनाच्या तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगाना घरकुल देण्याबाबत आदेश नसल्याने अपंगाना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. नविन अध्यादेश काढून इंदिरा आवास योजनेत अपंगाकरिता घरकूल मिळवून दयावे अशी मागणी अपंग संघटनेनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)