शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लोकगीतांच्या तालावर धानरोवणी

By admin | Updated: July 7, 2016 00:35 IST

असे सुमधूर लोकगीत कानाला एैकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुरु असलेल्या रोवणी दरम्यान महिलाकडून गायली जात आहे.

काहिसा सुखावला : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षाशिवशंकर बावनकुळे साकोलीपावसाच्या सोबतीन अंग भिजेजागो जागी,केवळा मोठा गुणवाण, कोण बाईराबविले मना,केवळा बोले हो केवळा बोलेअसे सुमधूर लोकगीत कानाला एैकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुरु असलेल्या रोवणी दरम्यान महिलाकडून गायली जात आहे. ही लोकगीत कानावर पडल्याने परिसरातील शेतात रोवणी सुरु असल्याचे लक्षात येते.तालुक्यात धान रोवणी धडाक्यात सुरू असून लोकगीतांनी शेतकऱ्यांचे शिवार गुंजू लागले आहे. या गितांनी आसमंत दुमदुमू लागले आहे. प्रारंभीचे काही दिवस पावसाअभावी कोरडे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत असताना आता पावसाने हजेरी लावल्याचे चिंताग्रस्त शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मुबलक पावसामुळे अनेकांनी प्रत्यक्ष रोवणीच्या कामाला धडाक्यात सुरुवात केली आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात जास्तीत जास्त महिला मजुरांना रोवणीसाठी बोलावू लागले.पऱ्हे काढणाऱ्यानी पऱ्हे काढले. चिखल केलेल्या बांधीत पेंड्या पसरविल्या आहेत. डोक्यावर मोऱ्याचे वजन घेवून रोवणी करीत मागे जाणऱ्या महिलाउठ उठ पाकुरा, जा माझ्या मायेराकेवळा मोठा गुणबान,कोण बाई राबविले मन्हा,केवळा बोले हो केवळा बोलेअसे लोकगीत गात भात रोवणी करीत आहेत. पुढे मालकीन व मागे मालक यांचा, रोवणी लवकर उरकावा यासाठी तगादा सहन करीत केव्हा एकदा पात पडते, याची प्रत्येक जण वाट पाहताना दिसत आहे. पात पडली की थोडी उसंत घेणे आणि पुन्हा नवीन पातीसाठी सज्ज होत आहेत. अशिक्षित महिलांनी चमक अनुप्रास यांचा योग्य वापर करून रचलेली सुरेख गाणी कानावर पडताच बहिनाबाई चौधरी यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. एका शेतकऱ्याच्या महिलांनी म्हटलेले हे गीत.पावसाच्या सोबतीनअंग भिजे जागो जागीघरातील सुहास चंदनाचाशेतकरी धरणी मायेलेदान पिकाची घरीअसे धान्याच्या राशीतालुक्यात ४० हजार ५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून २४ हजार हेक्टर क्षेत्र धान लागवडीखाली आहे. पेरणीच्या कामांना जोमाने सुरुवात करण्यात आली. शालेय मुले-मुली वार्षिक शैक्षणिक खर्च काढण्यासाठी शेतशिवारात कामावर जात आहेत. अस्सल लोकगीतांची खाण असलेला शेतशिवारात सर्वदूर मजूर कोकीळेचे सूर ऐकायला येतात, याच सामूहिक लोकगीतांची मैफील धान रोवणी करताना दिसून येते.गावच्या पाटलाचाशेतशिवारी रोवणाराखी बांधाया, येईल बयना,लागे पावसाचा हेवा,हर बोला हर हर महादेवाअशा लोकगीतांनी शेतशिवार चैतन्याने न्हाऊन निघाले आहे. रोवणीच्या वेळी लोकगीत म्हणण्याची पद्धत पूर्वीच्या काळापासून रूजली आहे. अलीकडच्या धकाधकीच्या युगात पुरातन स्त्री शेतावर असे लोकगीत म्हणताना दिसत आहे. इतर मजुरांमध्ये शाळकरी मुली, शिक्षित स्त्री या सुद्धा शेतात रोवणीला जात असल्यामुळे त्यांच्या तोंडी पुरातन रोवणीच्या गीताऐवजी चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. लोकगीत काळानुरुप लुप्त होत चालली आहेत. अनेक काळापासून सुरु असलेल्या लोकगीताच्या संस्कृतीला नव्या पिढीने नाकारले आहे.रोवणी संपल्याने शेतकरी समाधानीपावसाने चांगली साथ देवून रोवणी आटोपल्यानंतर बळीराजाला आनंद होतो. रोवणी संपण्याच्या दिवशी चिखलाची पूजा करून तो प्रत्येकाला लावतात आणि अंगावर चिखल टाकला जातो. खाद्यावर नांगर घेवून चालणारी गडी माणसं आणि मागे गीत गाणाऱ्या महिला यांच्या सोबत मालक मालकीन घराकडे जाताना गाणे गात जातात.कोण्या पाटलाचा, रोवणा सरला गं,पाटलाचा रोवणा सरला,वजा आणते कोणाची राणी,वजा आणते पाटलाची राणीअशी गाणी म्हणत सारे देवाळापाशी येतात आणि देवाळाला चिखल अर्पण करतात, असे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.