शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
2
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
3
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
4
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
5
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
6
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
7
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
8
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
9
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
10
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
11
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
12
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
13
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
14
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
15
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
16
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
17
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
18
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
19
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
20
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: December 2, 2014 23:01 IST

शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

भंडारा काँग्रेस कमेटीचे धरणे आंदोलन: तहसलिदार यांना निवेदन सादर
भंडारा : शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
निवेदनात नमुद केल्याप्रमाणे अस्मानी संकटामुळे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे उत्पादनच आले नसून कापसाचे उत्पादन अत्यल्प आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसून राज्य सरकारने वेळीच व पुरेसे कापूस खरेदी केंद्रही उघडले नाहीत. धानाचा शेतकऱ्यांनाही अल्प पावसामुळे चांगले उत्पादन मिळालेले नाही. ज्या भागात बऱ्याचपैकी धान उगवले होते. तिथे अतिवृष्टीमुळे पीक गमवावे लागले. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप योग्य भाव ठरवून दिलेला नाही. अवकाळी पाऊस व वादळामुळे फळबागा उध्वस्त झाल्या आहेत.
अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील जिल्हयामध्येही दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. या परिस्थितीत सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर कापसाला ६,००० रुपयांचा भाव ठरवून बाजार भावावरील रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. ओलीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी आहे.
राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याची मागणी ही करण्यात आली आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असल्यामुळे शेती कर्ज व विज बिल माफ करण्याची नितांत गरज आहे.
वीज बिल माफ केल्यास शेतकऱ्यांना काही मदत होईल.
अहमदनगर जिल्हयातील जवखेडा येथे दलित समाजाच्या जाधव कुटूंबातील तीन जनांची एक महिन्यापूर्वी अत्यंत क्रूर पध्दतीने निर्घुण हत्या करण्यात आली.
पंरतु अजुनही आरोपींना अटक झालेली नाही. राज्याचा पोलिस विभाग आरोपींना अटक करण्यास असमर्थ असेल तर सरकारने ही चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारकडे बहुमत नाही. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. भाजप पुन्हा बहुमत सिध्द करीत नाही. तोपर्यंत त्यांचे राज्यसरकार बरखास्त करुन त्यांनी घेतलेले सर्व निर्णय स्थगित करण्याची मागणी आहे.
या मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणविर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, राजकुमार मेश्राम, अजय गडकरी, अनिक जमा पटेल, शमिम शेख, पृथ्वीराज तांडेकर, आनंद तिरपुडे, मुकुंद साखरकर, इमरान पटेल, शर्मिल बोदेले, मंगेश हुमने, पिसाराम चोपकर, चोलाराम गायधने, रामभाऊ कडव, राकेश कडबे, पराग खोब्रागडे, निखिल कुंभलकर, जय बोरकर, शमिम पठान, भावना शेंडे, भारती लिमजे, कविता चाचेरे, हिरालाल मस्के यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)