शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत हरीणाचा मृत्यू

By admin | Updated: September 24, 2016 01:41 IST

जंगलातून भटकलेल्या एका हरीणाचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला

भंडारा : जंगलातून भटकलेल्या एका हरीणाचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास भंडारा-रामटेक मार्गावरील खुर्शीपार-टवेपारनजीक घडली. माहितीनुसार, भंडारा-रामटेक मार्गावरील खुर्शीपार हा परिसर जंगलाला लागून आहे. या मार्गाने पियुष घाटोळे हा तरूण दुचाकीने खातकडे जात होता. काही अंतरावर त्यांना मोठा आवाज आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता खुर्शीपार मार्गावर एक हिरन तडफडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी या हरीणाला पाणी पाजले. जखमा जास्त असल्यामुळे या हरीणाचे तडफडणे बंद झाले नव्हते. काही वेळातच या हरीणाचा मृत्यू झाला. याची माहिती त्यांनी भंडारा वनविभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर वनकर्मचारी गौरी नेवारे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या मृत हरीणाला घेऊन गेले. त्यानंतर पशुवैद्यकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह पुरण्यात आला. वर्षभरातील चौथी घटना सहा महिन्यापूर्वी अशोका हॉटेलसमोर हरीणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वडद परिसरात एका हरीणाचा अपघातात मृत्यू झाला होता. हरीणाच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)