शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

परसोडी येथे डेंग्यूची परिस्थिती आटोक्यात

By admin | Updated: August 21, 2014 23:36 IST

तालुक्यातील परसोडी येथे मागील एक महिन्यापासून ताप व डेंग्यूची लागण सुरु आहे. यात दोन बहिणींचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. तसेच गावात

साकोली : तालुक्यातील परसोडी येथे मागील एक महिन्यापासून ताप व डेंग्यूची लागण सुरु आहे. यात दोन बहिणींचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची काळजी घेण्यात येत आहे. तसेच गावात या साथरोगावर आळा बसविण्यासाठी उपाययोजना सुरु आहे. सध्या परसोडी येथील परिस्थिती आटोक्यात असली तरी दोन बहिणींच्या मृत्यूमुळे गावातील नागरिकांना भितीचे वातावरण आहे. परसोडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र विर्शी अंतर्गत शिबिर लावण्यात आले असून या शिबिरात डेंग्यूची व तापाची रक्ताची तपासणी करण्यात येत आहे. तसेच डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास त्यांना उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविण्यात येत आहे. एक महिन्याच्या कालावधीत परसोडी येथे ४५ रुग्णांना तापाची लागण झाली तर सात जणांना डेंग्यूची लागण झाली होती. यापैकी भूमिता गोटेफोडे व निशा इरले या दोन बहिणींचा मृत्यू झाला तर यांचा भाऊ हा नागपूर येथे उपचार घेत आहे. तर उर्वरीत तिघांची प्रकृती बरी असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.थोटे यांनी सांगितले. परसोडी येथे डेंग्यूची लागण होताच आरोग्य विभागातर्फे डेंग्यूची उत्पत्ती होणारी अळीचा आधी नायनाट करण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नागरीकांच्या सहकार्याने साचलेल्या पाण् यात, नाल्यात, गोबरगॅसच्या खड्यात संडासच्या खड्यात गळलेले आईल व रॉकेल टाकण्यात आले. तसेच गावात एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावे असे सांगून गावकऱ्यांना जागरूक करण्यात आले.सध्या या गावातील परिस्थिती आटोक्यात असून आरोग्य विभागातर्फे शिबिर लावण्यात आले आहे. मात्र गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)