शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी पोहचलेच नाही

By admin | Updated: May 22, 2017 00:43 IST

जीवनदायीनी वैनगंगा नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. बावनथडी धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आला

राहुल भुतांगे । लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : जीवनदायीनी वैनगंगा नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. बावनथडी धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आला असला तरी तो वैनगंगेत पोहचलाच नाही. परिणामी, तुमसर शहरात भिषण जलसंकट निर्माण झाले आहे. या जलसंकटाला प्रतिउत्तर देण्याकरिता पालिका प्रशासन शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहे. गतवर्षी पडलेला अत्यल्प पाऊस व वाढत्या प्रदुषणामुळे तापमानात झालेल्या वाढीमुळे फेब्रुवारी महिन्यात जीवनदायनी वैनगंगा नदीतील पाणी आटण्याला सुरुवात झाली होती. मे महिन्याच्या शेवटी उद्भवणारी स्थितीने मार्च व एप्रिल महिन्यातच डोकेवर काढले. भविष्यातली उद्भवणारी जलसंकट लक्षात घेता बावनथडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे म्हणून आमदार, खासदार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दखलही झाली. बावनथडी धरणाचे पाणी सोडण्यात आले. धरणाचे पाणी सोडल्याने जनतेची तहान भागविली जाणार होती. परंतू तसे काही झालेच नाही व आणखीही विदारक स्थिती निर्माण झाली. नदीपात्रातील पाणी आटले असतांना देखील नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांच्या पुढाकाराने नदीपात्रात पोकलँड लावून डोहातील पाणी इंटकवेल पर्यंत आणले. पाणी आटल्याने तुमसरकरांना नळाचे पाणी मिळण्याची आशा धुसर झाली आहे. या स्थितीचा सामना करण्याकरिता पालिकेने शहरातील विविध भागात सहा इंच बोअरवेलचे खोदकाम केले त्या बोअरवेलमधून टँकरने पाण्याचा उपसा करुन शहरवासीयांना पाणी पुरवठा करणार होते. मात्र तिथेही मांजर आडवी गेली. खोदलेल्या बोअरवेल मध्ये पाणीच लागले नाही. यापैकी काही बोअरवेलला पाणी लागले परंतू ते बोअरवेल शहरवासीयांना पाणीपुरवठा करु शकत नाही. परिणामी शहरातील पुरातन व मोठ्या विहिरीचा शोध घेवून त्याचा उपसा करून तुमसरवासियांना पाणीपुरवठा करणे सुरु आहे. त्यात शहरातील राष्ट्रीय विद्यालयातील मोठी विहिर, जयपुरिया भवनातील विहिर, भुजली तलावनजिकची विहिर, खापाटोली येथील धांडे यांच्या घराजवळील विहिरीचा समावेश असून आणखीही विहिरीचा शोध सुरु आहे. एवढे शर्तीचे प्रयत्न नगर पालिका प्रशासनाद्वारे सुरुच आहेत. मात्र उन्हाची दाहकता लक्षात घेता पाण्याचे स्त्रोत आटून भिषण पाणी टंचाईच्या समस्येत अजुन वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वैनगंगा पुर्णत: कोरडी पडल्याने तुमसरात जलसंकट निर्माण झाले आहे. संकटाला सामोरे जाण्याकरिता न.प. प्रशासन पुर्ण ताकदीनीशी उभी आहे. ही नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या दुरुपयोग कमीत कमी १५ दिवस दमदार पाऊस येस्तोवर टाळून पाणी टंचाई स्थितीवर मात करता येवू शकते जनतेनेही सहयोग करावा. प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर