तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:34+5:302021-04-09T04:37:34+5:30

तुमसर : तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर थातूरमातूर वृक्षलागवड करण्यात आली, ...

Cutting of deciduous trees in Tumsar-Devhadi road construction | तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची कत्तल

तुमसर : तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर थातूरमातूर वृक्षलागवड करण्यात आली, परंतु वृक्षांच्या संगोपनाकडे येथे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नियोजनाअभावी वृक्ष जिवंत राहण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

संबंधितांनी दहा वर्षे देखभाल, नियोजन करण्याचा नियम आहे. संबंधित खात्याने त्याकडे गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. तुमसर-देव्हाडी रस्ता चौपदरीकरण करण्यात आला. त्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला डेरेदार ७० ते ८० वर्षे जुने असे मोठे वृक्ष होते. त्यांची संख्याही मोठी होती, परंतु रस्ता बांधकामात ती संपूर्ण झाडे कापण्यात आली. रस्ता बांधकाम पूर्ण झाले. पावसाळ्यात संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केली. परंतु वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन व देखरेख होताना दिसत नाही. वृक्ष लागवड केल्यानंतर ती झाडे दिसत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची कामे करण्यात आली. नवीन झाडे येथे डोळ्याला दिसत नाही. गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे.

रस्ता बांधकामात तोडण्यात आलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्याचा नियम आहे. तशा प्रकारचा करार पूर्वी करण्यात येतो. वृक्ष लागवडीनंतर सुमारे दहा वर्षे त्या झाडांचे संगोपन व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. येथे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. परंतु त्यांची देखरेख व संगोपन या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे झाडांची वाढ कशी होणार, हा येथे मुख्य प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुन्हा डेरेदार वृक्ष उभे कसे राहतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Cutting of deciduous trees in Tumsar-Devhadi road construction