शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 00:31 IST

आंतरजातीय विवाह करणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा मुलीकडील कुटुंबीयांनी दगडाने ठेचून खून केला.

वरठीतील घटना : आंतरजातीय विवाहाचा काढला वचपावरठी : आंतरजातीय विवाह करणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा मुलीकडील कुटुंबीयांनी दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान येथील नेहरु वॉर्डात येथे घडली. सोनू क्रिष्णा मेश्राम असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन एकाच कुटुंबीयातील चार व अन्य एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.वरठी येथील सोनू मेश्राम याची भंडारा येथील एका युवकाबरोबर मैत्री होती. त्यामुळे सोनूचे नियमित युवकाच्या घरी जाणे-येणे होते. दरम्यान, सोनू मेश्रामचे युवकाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही कुटुंबीयांना न सांगता २३ मे २०१६ रोजी दशबल पहाडी हत्तीडोई येथे बौध्द विहारात गुप्तपणे लग्न केले. लग्नानंतर सदर मुलगी ३१ मेपर्यंत वडिलांच्या घरी राहत होती. १ जून २०१६ पासुन सोनू व त्याची पत्नी हे वरठी येथील नेहरु वॉर्डातील घरी राहायला आले. मुलीच्या कुटुंबीयांना लग्नाची माहिती मिळाल्यावर त्यांनी लग्नास विरोध केला. अनेकदा मुलीला सोनूपासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण प्रेमात मग्न असलेल्या मुलीने सोनूपासून विभक्त होणे मान्य केले नाही.२५ जून रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान वसीम शेख नामक व्यक्ती सोनूच्या घरी आला व त्याला बाहेर घेऊन गेला. त्यावेळी त्याच्यासोबत हमीद बब्बु शेख (४५), अलीम बब्बु शेख (४२), कलाम बब्बु शेख (४०) रा. बैरागी वाडा भंडारा व तौलीक हमी शेख (२०) रा. गोंदिया होते. सोनू त्यांच्यासोबत बाहेर गेल्यामुळे घरचे सदस्य झोपी गेले. पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान सोनू रक्ताने भरलेल्या अवस्थेत घरी आला.सोनूच्या आईने शेजारी राहणाऱ्या त्याचा भाऊ नितीन याला बोलावून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी येथे नेले. गंभीर जखमी असल्यामुळे त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दवाखान्यात हलविण्यापर्यंत स्थिती गंभीर झाल्यामुळे त्याला भंडारा येथून नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करुन रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वरठी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन वरठी पोलिसांनी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविला. तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सावणे व सहायक पोलीस उपनिरीक्षक तुलाराम गभणे करित आहेत. (वार्ताहर)दगडाने ठेचल्याचा संशयसोनूला रात्री ११ वाजता घरुन घेऊन गेल्यानंतर पहाटे २.३० वाजता तो खुनाने माखलेल्या स्थितीत घरी परतला. तीन तास कुठे होता. काय झाले कुणाला माहीत नाही. पण घराबाहेर काही अंतरावर मोठा दगड रक्ताने माखलेला आढळला. त्यामुळे बाचाबाचीदरम्यान त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.‘सैराट’ची पुनरावृत्तीबहुचर्चित ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील कथेनुसार यात नायक व नायिकेची हत्या करण्यात येते. चित्रपटातील कहाणीप्रमाणे प्रेमीयुगुलाच्या लग्नानंतर मुलीकडील मंडळीचा विरोध असतो. असाच प्रकार या घटनेतूनही दिसून आला. यात मात्र सुदैवाने नायिका बचावली. या घटनेने पुन्हा एकदा ‘सैराट‘ची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.